आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय वायूदलाच्या जनरल कोर्ट मार्शलने दलाचे ग्रुप कॅप्टन सुमन रॉय चौधरींच्या बडतर्फीचे आदेश दिले आहेत. जम्मू-काश्मिरातील बडगाममध्ये आपलेच हेलिकॉप्टर पाडल्याच्या प्रकरणात ते दोषी आढळले आहेत.
27 फेब्रुवारी 2019 27 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या हल्ल्यात वायुदलाचे सहा कर्मचारी आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. तेव्हा ग्रुप कॅप्टन चौधरी श्रीनगर वायुदलाचे प्रमुख कार्यान्वयन अधिकारी होते. वायुदलाचे हेलिकॉप्टर श्रीनगरला परत येत असताना त्याला दलाच्याच क्षेपणास्त्राने लक्ष्य केले होते. या दिवशी भारत आणि पाकिस्तानी वायूदलादरम्यान लढाई सुरू होती.
या प्रकरणी आधी कोर्ट ऑफ इन्क्वायरीने तपास केला होता. यानंतर वायुदलाच्या कोर्ट मार्शलची स्थापना करण्यात आली होती.
हायकोर्टातही केस चालली
हे प्रकरण पंजाब आणि हरियाणा कोर्टातही सुरू आहे. कोर्टाच्या निर्णयानंतरच वायूदल जनरल कोर्ट ऑफ मार्शलचा आदेश लागू करू शकते. वायुदल प्रमुखांच्या आदेशानंतर हा आदेश लागू केला जाईल. पुलवामा घटनेनंतर ही घटना घडली होती. पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते.
विंग कमांडर अभिनंदनने पाकचे जेड पाडले
त्याच दिवशी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान नियंत्रण रेषेनजिक पाक वायुदलासोबत हवाई लढाई लढत होते. युद्धादरम्यान वर्धमान यांनी पाकचे एफ-16 जेट हाणून पाडले होते. त्यांचे मिग विमानही पडले होते. मात्र ते वेळीच इजेक्ट झाले आणि पाकव्याप्त काश्मिरात लँड झाले. नंतर पाकने त्यांना भारताकडे सुपूर्द केले होते.
मुख्यालयाच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी चौधरी दोषी
ग्रुप कॅप्टन चौधरींना 14 जुलै 2017 रोजी वायुदल मुख्यालयाच्या सामान्य आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. या घटनेत देशाचे 133.31 कोटींचे नुकसान झाले. मृतांमध्ये पायलट स्क्वाड्रन लीडर एस वसिष्ठ, स्वाक्ड्रन लीडर निनंद एम, सार्जंट व्हीके पांडे, सार्जंट विंक्रांत सहरावत, कॉर्पोरल पंकज कुमार, कॉर्पोरल डी पांडे आणि बडगाम जिल्ह्यातील रहिवासी किफायत हुसैन गनी यांचा समावेश आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.