आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'Super Anaconda' Train Ran On Rail For The First Time In The India ; The Record Of Running A Freight Train 2 Km Long By Adding 3 Freight Trains

पहिल्यांदाच:देशात रुळावर धावली ‘सुपर अ‍ॅनाकोंडा’; 3 मालगाड्या जोडून केला दोन किमी लांब मालगाडी चालवण्याचा विक्रम

राऊरकेला2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 177 वॅगनमधून 15 हजार टन मालाची वाहतूक

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने तीन मालगाड्या जोडून देशात पहिल्यांदा दोन किमी लांब मालगाडी चालवण्याचा विक्रम केला. ‘अ‍ॅनाकोंडा फॉर्मेशन’मध्ये ही रेल्वे ओडिशातील लाजकुरा आणि राऊरकेला दरम्यान चालवण्यात आली. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी तिचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आणि तिला ‘रुळावर सुपर अ‍ॅनाकोंडा’ अशी उपमा दिली. त्यांनी लिहिले, सामान असलेल्या १७७ वॅगनची ही मालगाडी जास्त वजनाची वाहतूक करण्यात रेल्वे मोठी कामगिरी आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, देशात पहिल्यांदा दोन किमी लांब रेल्वे चालवण्यात आली. या मालगाडीत १५ हजार मालाची वाहतूक करण्यात आली. मालवाहतुकीच्या वेळेत बचत करण्यासाठी हा अनोखा प्रयोग करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...