आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएलच्या यंदाच्या सत्रातील दुसरा डबल हेडर आज सुपर संडेला रंगणार आहे. रविवारी माजी कर्णधार विराट काेहलीला आपल्या घरच्या चिन्नास्वामी मैदानावर टीम इंडियाच्या कर्णधार राेहित शर्माच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. यजमान राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स संघ सायंकाळी ७.३० वाजेपासून चिन्नास्वामी मैदानावर समाेरासमाेर असतील. पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा या सामन्यातील विजयाचा दावा मजबूत मानला जात आहे. दुसरीकडे राजस्थान राॅयल्स आणि यजमान सनरायझर्स हैदराबाद संघांत सामना हाेणार आहे.
सुपर संडेच्या सायंकाळी क्रिकेटच्या विश्वातील दिग्गज खेळाडू समाेरासमाेर असतील. यामध्ये खास करून विराट काेहलीसह राेहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डुप्लेसिस यांचा समावेश आहे. मुंबई इंडियन्सची आतापर्यंतची लीगमधील कामगिरी लक्षवेधी ठरलेली आहे. राेहितच्या नेतृत्वात संघाने आतापर्यंत पाच वेळा किताब पटकावला. दुसरीकडे बंगळुरू संघाला सुमार खेळीमुळे सातत्याने अपयशाचा सामना करावा लागत आहे. गत सत्रामध्ये बंगळुरू संघ चाैथ्या स्थानावर हाेता. आता बंगळुरू संघ आपल्या घरच्या मैदानावर विजयी सलामी देण्यासाठी उत्सुक आहे. आतापर्यंत या दाेन्ही संघांमध्ये २९ सामने झाले. यामध्ये १७ सामन्यांत मुंबईने विजय साजरा केला. १२ सामन्यांत बंगळुरू संघ विजेता ठरला.
काेहलीला षटकारांचे शतक साजरे करण्याची संधी : बंगळुरू संघाच्या कर्णधार विराट काेहलीला आता घरच्या मैदानावर षटकारांचे शतक साजरे करण्याची संधी आहे. यासाठी त्याला फक्त ३ षटकारांची गरज आहे. त्याच्या नावे आतापर्यंत ९७ षटकारांची नाेंद आहे. तसेच काेहलीच्या नावे चिन्नास्वामी मैदानावर आतापर्यंत २७६२ धावांची नाेेंद आहे. तसेच त्याला आयपीएलमध्ये सात हजारी हाेण्याची संधी आहे. यासाठी त्याला ३७६ धावांची गरज आहे. यामुळे ताे सत्रात हा पल्ला गाठू शकणार आहे.
हैदराबाद-राजस्थान समाेरासमाेर -आयपीएलचा चाैथा सामना रविवारी यजमान सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान राॅयल्स यांच्यात हाेणार आहे. टीम इंडियाचा गाेलंदाज भुवनेश्वर कुमार आता पहिल्यादंाच आयपीएलमध्ये कर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्याकडे हैदराबाद संघाचे नेतृत्व साेपवण्यात आले आहे. दुसरीकडे संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान संघाने विजयी सलामीसाठी कंबर कसली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.