आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Supermoon: First Supermoon And Blood Moon Of 2021 Clicked By Suman Dube For DivyaMarathi

फोटोंमध्ये पाहा नेत्रदीपक ब्लडमून:2021 च्या पहिल्या खग्रास चंद्रग्रहणासह जगाने पाहिला तेजस्वी सुपरमून आणि ब्लड मून, जगभरात टिपलेली छायाचित्रे...

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
2021 चा पहिला सुपर मून... - Divya Marathi
2021 चा पहिला सुपर मून...

या वर्षातील पहिले खग्रास चंदग्रहण बुधवारी झाले. याच दिवशी सुपरमूनही दिसला. भारतात खग्रास चंद्रग्रहण दिसले नसले तरी ईशान्य भागात खंडग्रास चंद्रग्रहण पाहावयास मिळाले. असा ब्लड मून आणि सुपरमून एकाच वेळी पाहण्याचा हा योग सहा वर्षांनंतर आला. ब्लड मून म्हणजे खग्रास चंद्रग्रहण. तर, चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो तेव्हा 7% मोठा आणि 14% जास्त तेजस्वी दिसतो त्याला सुपरमून म्हणतात. जगात काही ठिकाणी लाल चंद्र दिसला, तर कुठे तप्त अग्निगोलासारखा पिवळा. हे छायाचित्र दिल्ली विमानतळाज‌वळ राहणारे ज्येष्ठ पत्रकार सुमन दुबे यांनी टिपले आहे. सुपरमूनसमोरून जाणारे एक विमान दुबे यांनी कौशल्याने कॅमेऱ्यात कैद केले.

दर्शन सुपरमूनचे
बुधवारी बुद्धपौर्णिमेला सायंकाळनंतर औरंगाबादकरांना सुपरमूनचे दर्शन झाले. या वेळी चंद्र आणि पृथ्वीतील अंतर या वर्षातील सर्वात कमी ३ लाख ५७ हजार ४६३ किलोमीटर होते. त्यामुळे चंद्रबिंब १४ टक्के अधिक तेजस्वी, ३० टक्के मोठे दिसले. एमजीएमच्या एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी ल्यूथर फिल्टरच वापर करत दुर्बिणीद्वारे टिपलेले सुपरमूनचे छायाचित्र.

एमजीएमच्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी छायाचित्र टिपलेले आहे.
एमजीएमच्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी छायाचित्र टिपलेले आहे.
दिल्लीमध्ये चंद्रग्रहण, सुपरमून, ब्लडमून एकत्र दिसले.
दिल्लीमध्ये चंद्रग्रहण, सुपरमून, ब्लडमून एकत्र दिसले.
महाराष्ट्राच्या सोलापुरातील राणी लक्ष्मीबाई पार्क मधील सुपरमूनचे दृश्य.
महाराष्ट्राच्या सोलापुरातील राणी लक्ष्मीबाई पार्क मधील सुपरमूनचे दृश्य.
बळीच्या देनपसार शहरातील टीती बांदा पार्कमधील चंद्र काहीसे असेच दिसत होते.
बळीच्या देनपसार शहरातील टीती बांदा पार्कमधील चंद्र काहीसे असेच दिसत होते.
गुजरातमधील अहमदाबादहून ब्लडमूनचे नेत्रदीपक दृश्य पाहायला मिळाले.
गुजरातमधील अहमदाबादहून ब्लडमूनचे नेत्रदीपक दृश्य पाहायला मिळाले.
ब्राझीलच्या रिओ दि जानेरो मधील क्रिस्ट दी रीडीमरच्या पुतळ्यामागील चंद्र दृश्य.
ब्राझीलच्या रिओ दि जानेरो मधील क्रिस्ट दी रीडीमरच्या पुतळ्यामागील चंद्र दृश्य.
रशियाच्या रोशॉश शहरातील ऑर्थोडॉक्स चर्चमागील सुपरमूनचे दृश्य.
रशियाच्या रोशॉश शहरातील ऑर्थोडॉक्स चर्चमागील सुपरमूनचे दृश्य.
ऑस्ट्रेलियामधील सिडनी ओपेरा हाऊसमागील चंद्रग्रहणाचे दृश्य.
ऑस्ट्रेलियामधील सिडनी ओपेरा हाऊसमागील चंद्रग्रहणाचे दृश्य.
तुर्कीच्या अंकारा येथील मुस्तफा कमल अतातर्क म्युझियमजवळील सुपरमून यासारखे दिसत होते.
तुर्कीच्या अंकारा येथील मुस्तफा कमल अतातर्क म्युझियमजवळील सुपरमून यासारखे दिसत होते.
बातम्या आणखी आहेत...