आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Supersonic Cruise Missile BrahMos Fired From The Navy's Stealth Vessel; Successfully Hit The Target In Arabian Sea

ब्रह्मोसचे आणखी एक परीक्षण:सुपरसोनिक क्रूज मिसाइल बह्मोस नेव्हीच्या स्टील्थ डेस्ट्रॉयर जहाजातून केली फायर, अरबी समुद्रातील टार्गेटवर साधला बरोबर निशाणा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्रह्मोस मिसाइल ध्वनी वेगाच्या तिप्पट वेगाने वार करु शकते, याचा वेग जवळपास 3457 किमी प्रतितास आहे

भारताची सुपरसोनिक क्रूज मिसाइल ब्रह्मोसने टेस्टची अजून एक स्टेज पार केली आहे. रविवारी सकाळी चेन्नईमध्ये मिसाइलला नेव्हीच्या स्टील्थ डेस्ट्रॉयर जहाज (याला शत्रूचे रडार पकडू शकत नाही) आयएनएस चेन्नईने फायर करण्यात आले. या मिसाइलने या टेस्ट फायरमध्ये अरबी महासागरात एका टार्गेटवर योग्य निशाणा साधला. डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनाइजेशन (डीआरडीओ) ने याची माहिती दिली. ही मिसाइल ध्वीनिच्या वेगापेक्षा तिप्पट वेगाने वार करु शकते. याचा वेग जवळपास 3457 किमी प्रतितास आहे. ही मिसाइल 400किमी रेंजपर्यंत निशाणा लावू शकते.

सुपरसोनिक क्रूज ब्रह्मोस मिसाइलला जमीन, जहाज आणि फायटर जेटने डागले जाऊ शकते. मिसाइलपूर्वी एक्सटेंडेड व्हर्जनचे परीक्षण 11 मार्च 2017 ला केले गेले होते. ब्रह्मोसचे नाव दोन नद्यांच्या नावाने घेतले जाते. यामध्ये भारतातील ब्रह्मपुत्र नदीचे 'ब्रह्म' आणि रशियाच्या मोस्क्वा नदीचे 'मोस' घेण्यात आले आहे.

दोन आठवड्यात दुसऱ्यांदा झाली मिसाइलची टेस्ट
डीआरडीओने टेस्ट यशस्वी राहिल्यानंतर म्हटले की, ब्रह्मोस एक प्राइम स्ट्राइक वेपन आहे. यामुळे आपल्या लढाऊ जहाजांना लांब अंतरावरुन वार करण्यात मदत मिळेल. दोन आठवड्यांपूर्वीही ओडिशाच्या चांदपुरा चांदीपुरा येथील इंटिग्रेटेड स्टेज रेंजमध्ये याची टेस्ट करण्यात आली होती. त्यावेळीही याच्या परीक्षणचे सर्व मापदंड यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले होते.

ब्राह्मोसचा भारतीय सैन्याच्या ताफ्यात समावेश आहे
याला भारतच्या डीआरडीओने रशियाच्या एनपीओ मॅशिनोस्ट्रोनिया (एनपीओ)सोबत मिळून तयार केले आहे. ब्रह्मोस त्या निवडक सुपरसोनिक क्रूज मिसाइलमध्ये समाविष्ट आहेत जे भारतीय वायुसेना आणि नवदलाच्या ताफ्यात सामिल आहे. नवीन आवृत्तीचे प्रपुल्शन सिस्टम, एअरफ्रेम, पावर सप्लायसह अनेक महत्त्वाचे उपकरण देशात विकसित करण्यात आले आहेत. प्रामुख्याने पाणबुड्या, जहाजे आणि बोटांना लक्ष्य करण्यात मदत होईल.

बातम्या आणखी आहेत...