आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुप्रीम कोर्टाने गुरुवारी दाइची-फोर्टिस प्रकरणात मलविंदरसिंग आणि शिवइंदरसिंग यांना सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली. कोर्टाने फोर्टिस-आयएचएच कराराचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याचा आदेशही दिला. ‘दाइची सँक्यो’ची याचिका निकाली काढताना सुप्रीम कोर्टाने आयएचएचच्या खुल्या ऑफरवर बंदी कायम ठेवली. मलेशियाच्या आयएचएच हेल्थकेअरने २०१८ मध्ये बोली प्रक्रियेत १.१ दशलक्ष डॉलर देऊन फोर्टिसमध्ये ३१ टक्के नियंत्रण हिस्सा मिळवला होता. तिने बाजारातून फोर्टिसच्या इतर २६ टक्के शेअरच्या अधिग्रहणासाठी एक खुली ऑफर ठेवली होती. ती पुढे नेली नाही. कारण दाइचीने त्याविरुद्ध याचिका दाखल केली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.