आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Supreme Court Judges Appointment | Narendra Modi Government | Collegium | Supreme Court

कॉलेजियमच्या शिफारशी स्वीकारण्यास विलंब झाल्याने SC नाराज:केंद्राला इशारा - कठोर निर्णय घेण्यास मजबूर करू नका

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांच्या नियुक्तीमध्ये होणाऱ्या विलंबाप्रकरणी एका याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली. या प्रकरणी केंद्राने कॉलेजियम व्यवस्थेवर एक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

सरकारने या शपथपत्राद्वारे सुप्रीम कोर्टातील 5 न्यायमूर्तींची नियुक्तीसंबंधीची कॉलेजियमची शिफारस लवकचर मान्य केली जाईल असे स्पष्ट केले आहे. विशेषतः अटॉर्नी जनरल यांनी याी प्रकरणी येत्या 5 दिवसांत या नियुक्त्या केल्या जातील असे स्पष्ट केले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 13 फेब्रुवारी रोजी होईल.

उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बदल्यांच्या शिफारशींना मंजुरी देण्यात होणाऱ्या विलंबावर सुप्रीम कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोर्टाने या प्रकरणी सरकारला ही अत्यंत गंभीर बाब असल्याचा इशारा दिला आहे. कोर्ट म्हणाले - हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. तुम्हाला त्रास होईल अशी भूमिका घेण्यास आम्हाला मजबूर करू नका.

कॉलेजियमने न्यायाधीशांच्या नावांची केली होती शिफारस

सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने 13 डिसेंबर रोजी सरकारला 5 नावांची शिफारस केली होती. त्यात न्या. पंकज मिथल मुख्य न्यायाधीश राजस्थान उच्च न्यायालय, न्या. संजय करोल मुख्य न्यायाधीश पाटणा उच्च न्यायालय, न्या. पी व्ही संजय कुमार मुख्य न्यायाधीश मणिपूर उच्च न्यायालय, पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला व अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश आहे.

सध्या SCमध्ये 27 न्यायमूर्ती कार्यरत

सुनावणीवेत अॅटर्नी जनरल आर व्यंकटरमणी यांनी न्यायमूर्ती एस के कौल व ए एस ओका यांच्या खंडपीठाला सांगितले की, 5 न्यायाधीशांच्या नियुक्तीचे वॉरंट लवकरच जारी केले जाईल. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या मंजूर जागा 34 आहे. पण सध्या 27 न्यायाधीशच कार्यरत आहेत. 5 न्यायाधीशांच्या शपथविधीनंतर हा आकडा 32 पर्यंत वाढेल.

बातम्या आणखी आहेत...