आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Supreme Court Decision Governor's Decision Of Floor Test Is Right For A Conviction

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मध्य प्रदेश:सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय - 'विश्वास ठरावासाठी फ्लाेअर टेस्टचा राज्यपालांचा निर्णय याेग्य'

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • फ्लाेअर टेस्टसाठी सर्वाेच्च न्यायालयाचा ६८ पानांचा विस्तृत अादेश जाहीर

मध्य प्रदेश सरकारला विश्वासदर्शक ठराव सिद्ध करण्यासंदर्भात राज्यपालांनी फ्लाेअर टेस्ट करण्याचा दिलेला अादेश सर्वाेच्च न्यायालयाने याेग्य ठरवला अाहे. न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड अाणि अजय रस्ताेगी यांच्या खंडपीठाने साेमवारी व्हिडिअाे काॅन्फरन्सिंगद्वारे ६८ पानांचा तपशीलवार निर्णय जाहीर केला. 

सरकार बहुमत गमावते त्या वेळी फ्लाेअर टेस्ट करणे गरजेचे असते. त्यामुळे राज्यपालांनी फ्लाेअर टेस्ट घेण्यासाठी अादेश देण्याचा निर्णय याेग्य हाेता. विद्यमान परिस्थितीनुसार राज्यपालांनी घेतलेला निर्णय याेग्य हाेता. ज्येष्ठ वकील अभिषेक मनू संघवी यांच्या राज्यपाल फ्लाेअर टेस्ट घेण्याचा अादेश देऊ शकत नाहीत या त्यांनी केलेल्या युक्तिवादाशी अापण सहमत नाही, असे न्या.चंद्रचूड म्हणाले. राज्यपाल विधानसभेचे सत्र चालू असतानादेखील अापला अधिकार व शक्तीचा उपयाेग करू शकतात. निर्णयानुसार चालू सत्रामध्ये बहुमत सिद्ध करण्याच्या दाेन पद्धती असतात. पहिली विश्वासदर्शक ठराव अाणि दुसरी फ्लाेअर टेस्ट. सध्याच्या प्रकरणामध्ये राज्यपाल स्वत: काेणताही निर्णय न घेता ते फ्लाेअर टेस्ट करण्यासाठी सांगत असल्याचे सादर झालेल्या तथ्यांवरून समजते.

फ्लाेअर टेस्ट का अावश्यक अाहे या संदर्भात एस अार. बाेम्मई प्रकरणानंतर अद्याप काेणताही निर्णय झालेला नाही. बाेम्मई प्रकरणात राज्यपालांनी घटनेच्या कलम ३५६ अंतर्गत अापल्या शक्तीचा प्रयाेग केला. विश्वासदर्शक ठराव चालू सत्रातही मांडता येऊ शकताे हे बाेम्मई प्रकरणाने दाखवून दिले अाहे.

बातम्या आणखी आहेत...