आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Supreme Court Decision On UGC Final Year Exams; Court Can Pronounce Verdict On Final Year Exams Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निर्णय पुन्हा स्थगित:अंतिम वर्षांच्या परीक्षा निर्णयावर सुप्रीम कोर्टात आजही सुनावणी झाली नाही, 18 ऑगस्ट रोजी झाली होती शेवटची सुनावणी

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 18 ऑगस्ट रोजी झालेल्या अंतिम सुनावणीत विविध राज्यांनी आपले युक्तिवाद न्यायालयात सादर केले

अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आजही आपला निर्णय देणार नाही. हे प्रकरण आजच्या यादीमध्ये नसल्याने आता हा निर्णय दुसर्‍या दिवशी घोषित केला जाईल. अशात आता विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत होणाऱ्या निर्णयासाठी आणखी थोडा काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

18 ऑगस्ट रोजी शेवटची सुनावणी झाली

यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने 18 ऑगस्ट रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती अशोक भूषण, आर. सुभाष रेड्डी आणि एमआर शाह यांच्या खंडपीठामार्फत होत आहे.

या अगोदर सोमवारी निकाल येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र नंतर वकील अलख आलोक श्रीवास्तव यांनी ट्विट केले होते की कोर्ट बुधवारपर्यंत निकाल देऊ शकते.

शेवटच्या सुनावणीत काय झाले?

विद्यापीठ आणि इतर उच्च शिक्षण संस्थांमध्ये पदवी आणि पदव्युत्तरच्या अंतिम वर्षांच्या किंवा सेमिस्टरच्या परीक्षा 30 सप्टेंबरपर्यंत घेण्याच्या यूजीसीच्या गाइडलाइन्सला आव्हान देणाऱ्या विविध याचिकांवर एकाच वेळी शेवटची सुनावणी 18 ऑगस्ट रोजी घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि ओडिशा अशा विविध राज्यांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. या राज्यांच्या सरकारांनी यापूर्वी या परीक्षा स्वत: रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. सुनावणी दरम्यान यूजीसीने या राज्यांचा निर्णय आयोगाच्या वैधानिक विशेषाधिकारांच्या विरुद्ध असल्याचे म्हटले होते.