आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Supreme Court Delhi Pollution | Shall We Consider 2 Days Lockdown To Tackle Air Pollution In Delhi, Asks Supreme Court

सुप्रीम कोर्टाने फटकारले:दिल्लीत दोन दिवसांचा लॉकडाउन लागू करावा का? हवेतील प्रदूषण दूर करण्यासाठी लवकरात लवकर उपाय करायलाच हवा -सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीत वाढत्या प्रदूषणाची सुप्रीम कोर्टाने दखल घेतली. तसेच केंद्र सरकारला याबाबत फटकारले आहे. केंद्र सरकारने दिल्लीतील वाढते प्रदूषण थांबवण्यासाठी दोन दिवसांच्या आत धोरण तयार करण्यास सांगितले आहे. सरन्यायाधीश रमना यांनी शनिवारी बोलताना, दिल्लीतील परिस्थितीचा दाखला देत आम्ही घरात सुद्धा मास्क घालत आहोत असे म्हटले आहे.

दोन दिवसांचा लॉकडाउन लावावा का? दिल्लीत प्रूदषणाची स्थिती अतिशय वाइट आहे. त्यावर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला कडक शब्दांमध्ये फटकारताना जाब विचारला आहे. दिल्लीत हवेचा दर्जा सुधारण्यासाठी सरकार काय करत आहे? याबाबत सरकारने एक आपातकालीन धोरण तयार करावे. "प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी नेमके काय करता येईल ते सांगा? दिल्लीत दोन दिवसांचा लॉकडाउन लावता येईल का?" अशी विचारणा सुप्रीम कोर्टाकडून करण्यात आली आहे.

जगातील सर्वात प्रदूषित शहर दिल्ली

स्वित्झर्लंडच्या हवामान समूहाने नवी दिल्ली शहराला जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हटले आहे. दिल्लीतील हवेची गुणवत्ता पातळी (AQI) आज 556 आहे, जी गंभीर श्रेणीत येते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) शुक्रवारी इशारा दिली की, पुढील 48 तास हवेची गुणवत्ता गंभीर राहील. राज्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी शाळा बंद करणे, खाजगी गाड्यांवर 'ऑड-इव्हन' बंदी घालणे आणि सर्व बांधकामे थांबवणे यासह आपत्कालीन उपायांची अंमलबजावणी करावी.

बातम्या आणखी आहेत...