आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Eknath Shinde And Uddhav Thackeray Supreme Court Hearing | Supreme Court Directs No Decision On Shiv Sena's Bow And Arrow Symbol Till September 27

ठाकरे-शिंदे वाद:धनुष्यबाण चिन्हाबाबत 27 सप्टेंबरपर्यंत निर्णय घेऊ नये, निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

नवी दिल्ली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदे सरकारची घटनात्मक वैधता, १६ आमदारांवर बजावलेली अपात्रतेची कारवाई, राज्यपालांची भूमिका यासह इतर मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात पाचसदस्यीय घटनापीठापुढे बुधवारी सुनावणी झाली. दरम्यान, शिवसेनेच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने २७ सप्टेंबरपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले.

न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या घटनापीठात न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली, न्या. पी. नरसिंहा यांचा समावेश असून त्यांच्यासमोर सत्तासंघर्षाची सुनावणी झाली. धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगाला कार्यवाही करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शिंदे गटाचे वकील अॅड. कौल यांनी घटनापीठाकडे केली. कोर्टाने स्थगिती दिल्याने निवडणूक आयोगाला चिन्हाबाबत निर्णय घेता येत नसल्याचे कौल यांनी सांगितले. ठाकरेंकडून अॅड. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत २७ सप्टेंबरपर्यंत निर्णय घेऊ नये

पक्षांतर्गत लोकशाही आणि फुटीबाबत निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबतचा मुद्दाही घटनापीठासमोर आहे. आयोगाकडून शिंदे गटाला पक्षाचे निवडणूक चिन्ह मिळाल्यास सगळेच व्यर्थ होईल, याकडे सिब्बल यांनी लक्ष वेधले. दोन्ही गटांच्या वकिलांचे म्हणणे ऐकल्यानंतर घटनापीठाने २७ सप्टेंबर रोजीच्या सुनावणीत आपण निर्णय घेऊ, तोपर्यंत तुमची ऊर्जा वाचवून ठेवा, असे म्हटले.

आमचे कर्तव्य बजावत आहोत, त्याला रोखता कामा नये

निवडणूक चिन्ह कायद्यानुसार तक्रार दाखल झाल्यास आम्हाला त्याची दखल घ्यावी लागते. या प्रकरणात काही कागदपत्रे जमा करण्यास, तपासण्यास वेळ जातो. आम्ही आमचे कर्तव्य बजावत आहोत. त्याला रोखता कामा नये. गेल्या सुनावणीत एखादी व्यक्ती आमदार म्हणून अपात्र ठरली तरी तिचे पक्ष सदस्यत्व कायम राहते असा मुद्दा मांडला आहे.- अॅड. अरविंद दातार, निवडणूक आयोगाचे वकील

बातम्या आणखी आहेत...