आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Supreme Court Grants Bail To Teesta Setalwad । Gujrat Riots Case । CJI Says She Was In Remand Or Custody Since Arrest

सुप्रीम कोर्टाकडून तिस्ता यांना जामीन मंजूर:CJI म्हणाले - अटक झाल्यापासून सेटलवाड रिमांड किंवा कोठडीत राहिल्या

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात दंगलीशी संबंधित कट रचल्याप्रकरणी कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती यू. यू. लळित यांच्या खंडपीठात 1 तास 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ सुनावणी झाली. आदेश सुनावताना सरन्यायाधीश म्हणाले की, तिस्ता अटक झाल्यापासून रिमांडमध्ये किंवा कोठडीत होत्या. त्यांना यापुढे तुरुंगात ठेवता येणार नाही.

गुजरात सरकारचे प्रतिज्ञापत्र दाखल

30 ऑगस्ट रोजी गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून तिस्ता यांच्या जामिनाला विरोध केला होता. सरकारने म्हटले- तिस्ता यांच्याविरुद्धची एफआयआर केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आधारित नाही, तर पुराव्यांचा आधार आहे.

तिस्ता सेटलवाड (डावीकडे) या गुजरात दंगलीप्रकरणी झाकिया जाफरी यांच्या सह-याचिकाकर्त्या होत्या.
तिस्ता सेटलवाड (डावीकडे) या गुजरात दंगलीप्रकरणी झाकिया जाफरी यांच्या सह-याचिकाकर्त्या होत्या.

आतापर्यंत केलेल्या तपासात, एफआयआरचे समर्थन करण्यासाठी, अशी सामग्री रेकॉर्डवर आणली गेली आहे ज्यामुळे हे स्पष्ट होते की अर्जदाराने इतर आरोपींशी संगनमत करून राजकीय, आर्थिक आणि इतर भौतिक लाभ मिळविण्यासाठी गुन्हेगारी कृत्ये केली होती.

सुप्रीम कोर्टाच्या टिप्पणीनंतर गुजरात पोलिसांनी केली होती अटक

2002च्या गुजरात दंगलीप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट देणाऱ्या एसआयटीच्या अहवालाविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने 24 जून रोजी फेटाळून लावली. झाकिया जाफरी यांनी ही याचिका दाखल केली होती. या दंगलीत झाकिया जाफरी यांचे पती एहसान जाफरी यांचा मृत्यू झाला होता.

30 जुलै रोजी ट्रायल कोर्टाने तिस्ता सेटलवाड यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.
30 जुलै रोजी ट्रायल कोर्टाने तिस्ता सेटलवाड यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.

झाकियांच्या याचिकेत योग्यता नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. या खटल्यातील सहकारी याचिकाकर्त्या तिस्ता यांनी झाकिया जाफरी यांच्या भावनांशी खेळल्याचेही न्यायालयाने म्हटले होते. न्यायालयाने तिस्ता यांच्या भूमिकेची चौकशी करण्यास सांगितले होते. त्यानंतर 25 जून रोजी अहमदाबाद क्राइम ब्रँचने तिस्ता यांना मुंबईतून अटक केली होती.

बातम्या आणखी आहेत...