आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Supreme Court Hearing 17 August 2020 On NEET UG And JEE Main Entrance Examinations, Students Of 11 States Filed A Petition To Postpone The Exam

कोरोना काळात परीक्षांबाबत मोठा निर्णय:अखेर... जेईईसह नीट परीक्षा ठरलेल्या तारखांनाच होणार, परीक्षांविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • JEE मेन 1 ते 6 सप्टेंबर, तर NEET यूजीचे आयोजन 13 सप्टेंबर रोजी होईल

कोरोना महामारीमुळे इंजिनिअरिंगची जेईई प्रवेश परीक्षा आणि मेडिकलची नीट प्रवेश परीक्षा रद्द करण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. आता जेईई मेन्स १ ते ६ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन मोड व नीट १३ सप्टेंबरपासून १६१ केंद्रांवर ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.

याचिकाकर्त्यांना फैलावर घेत कोर्ट म्हणाले, काेरोनामुळे देशात सर्व काही थांबवायचं का? विद्यार्थ्यांचे बहुमोल वर्ष असंच वाया जाऊ दिलं शकत नाही. कोरोना काळात आयुष्य पुढे न्यावंच लागेल. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करून परीक्षा आयोजित केल्या जातील, असे स्पष्ट केले.

११ राज्यांतून याचिका

> ११ राज्यांतील ११ विद्यार्थ्यांनी काेरोनामुळे आयआयटी-जेईई व नीटच्या प्रवेश परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी केली होती. त्यांची बाजू मांडणारे वकील अलख श्रीवास्तव म्हणाले, काेरोनाची जोखीम सातत्याने वाढत आहे. सीए आणि क्लेटच्या परीक्षाही रद्द केल्या आहेत. यामुळे जेईई-नीटच्या परीक्षा आयोजित करून ही जोखीम वाढू देण्याची परवानगी दिली जाऊ नये.

> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोना लसीची चाचणी शेवटच्या टप्प्यात असल्याचे सांगितले आहे. यामुळे लस आल्यानंतरच परीक्षा घेतल्या जाऊ शकतात. तोवर त्या लांबणीवर टाकल्या पाहिजेत, असा युक्तिवाद केला होता.

बातम्या आणखी आहेत...