आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Supreme Court Hearing On Challenging Promotion Of 68 Judicial Officers In Gujarat

सुनावणी:68 जजच्या पदोन्नतीविरोधात आज SCत सुनावणी; राहुल गांधींना शिक्षा ठोठावणाऱ्या न्यायाधीशांचाही समावेश

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांना शिक्षा सुनावणारे न्यायाधीश हरीश वर्मा यांच्या बढतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सुरत न्यायालयाचे न्यायाधीश हरीश वर्मा यांच्यासह 68 न्यायाधीशांच्या पदोन्नतीला या याचिकेत आव्हान देण्यात आले आहे. वास्तविक, या न्यायाधीशांना 65% कोट्याच्या नियमानुसार पदोन्नती देण्यात आली आहे, ज्याला वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश संवर्गातील दोन अधिकाऱ्यांनी आव्हान दिले आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती एमआर शाह या खटल्याची सुनावणी करणार आहेत.

याचिकाकर्त्यांनी दावा केला आहे की, असे अनेक न्यायाधीश आहेत. ज्यांनी बढतीसाठी परीक्षेत जास्त गुण मिळवले आहेत. तरीही त्याची निवड झाली नाही. तर त्यांच्यापेक्षा कमी गुण मिळविणाऱ्या उमेदवाराला बढती देण्यात आली.

10 मार्च रोजी पदोन्नती लिस्ट जाहीर, सर्व जज घेताहेत प्रशिक्षण
पदोन्नती मिळालेल्या न्यायाधीशांची नव्या जागेवर नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्वजण सध्या गुजरात न्यायिक अकादमीत प्रशिक्षण घेत आहेत. दरम्यान, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश संवर्गातील न्यायिक अधिकारी रवी कुमार मेहता आणि सचिन मेहता यांनी त्यांच्या बढतीला आव्हान दिले होते. याचिकेत त्यांनी गुजरात उच्च न्यायालयाने 10 मार्च रोजी जारी केलेली पदोन्नती यादी रद्द करण्याची मागणी केली आहे. याशिवाय गुजरात सरकारने जारी केलेल्या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

वाचा- या प्रकरणात आत्तापर्यंत काय घडले?

  • 16 ऑक्टोबर 2022 : गुजरात उच्च न्यायालयाने न्यायिक अधिकाऱ्याच्या पदोन्नतीसाठी लेखी परीक्षा घेतली.
  • 16 नोव्हेंबर 2022 : उच्च न्यायालयाने परीक्षेत पात्र ठरलेल्या 175 न्यायिक अधिकाऱ्यांची यादी जाहीर केली.
  • 10 मार्च 2023 : वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशांच्या निवडक न्यायिक अधिकाऱ्यांची यादी प्रसिद्ध केली.
  • 18 मार्च 2023 : 68 न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी अधिसूचना जारी केली. यामध्ये न्यायाधीश एच.एच. वर्मा यांचाही समावेश आहे.

हे ही वाचा

दिव्य मराठी एक्सप्लेनर - राहुल यांची खासदारकी रद्द, निवडणुकीवरही बंदी:निवडणूक लढवता येईल का? तुरुंगात जातील की, 8 वर्षांचा ब्रेक

राहुल गांधी आता खासदार राहिलेले नाहीत. शुक्रवारी लोकसभा सचिवालयाने त्याची अधिसूचना जारी केली. घटनेच्या कलम 102(1) आणि लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 8 नुसार त्यांना संसदेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. - येथे वाचा संपूर्ण बातमी