आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन पत्नीच्या बलात्काराप्रकरणी पती निर्दोष:सुप्रीम कोर्टाने बलात्काराच्या व्याख्येतील अपवादाच्या तरतुदीचा दिला लाभ

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वोच्च न्यायालयाने अल्पवयीन पत्नीशी लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी पतीची निर्दोष सुटका केली. या पतीला उच्च न्यायालयाने दोषी घोषित केले होते. याविरोधात त्याने सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले असता तिथे त्याला न्याय मिळाला. सुप्रीम कोर्टाने त्याची बलात्काराच्या व्याख्येतील अपवादाच्या तरतुदीचा लाभ देत निर्दोष सुटका केली.

हायकोर्टाने बलात्काराप्रकरणी ठरवले होते दोषी

या प्रकरणी न्यायमूर्ती बी आर गवई यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. हायकोर्टाने आरोपीला पोक्सो कायद्यांतर्गत दोषी घोषित करण्यात आले होते. पण कर्नाटक उच्च न्यायालयाने प्रकरण बलात्कारात रुपांतरित करत आरोपीला दोषी घोषित केले. 'पोक्सो कायदा 2012 मध्ये अस्तित्वात आल्यामुळे तो पूर्वीच्या प्रकरणांत लागू होत नाही. विशेषतः पीडित अल्पवयीन असल्याने व ती 16 वर्षांखालील असल्याने तिने शारीरिक संबंधांसाठी दिलेल्या परवानगीला काहीच अर्थ नसतो. त्यामुळे पती बलात्काराप्रकरणी आपसूकच दोषी ठरतो', असे हायकोर्टाने म्हटले आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे कायद्यानुसार 18 वर्षांखालील मुलीशी तिच्या सहमतीने लैंगिक संबंध प्रस्थापित केले, तरच तो बलात्कार ठरतो. हायकोर्टाने या कायदेशीर तरतुदींतर्गत आरोपीला दोषी घोषित केले होते.

सुप्रीम कोर्टाने मुलीच्या प्रतिज्ञापत्रानुसार केला न्याय

हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले तेव्हा न्यायालय म्हणाले की, मुलीने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. तिच्या मते तिने आरोपीसोबत लग्न केले आहे. त्यांच्यात सहमतीचे संबंध प्रस्थापित झाले होते. त्यांना एक अपत्यही आहे. सुप्रीम कोर्ट पुढे म्हणाले की, भादंवि कलम 375 मध्ये बलात्काराची व्याख्या नमूद आहे. त्यात वैवाहिक बलात्काराला अपवादाच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. पत्नीचे व 15 वर्षांच्या वर असेल तर पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करता येत नाही. प्रस्तुत प्रकरणात पती व पत्नीमध्ये लैंगिक संबंध होते. पण पत्नीचे वय 15 वर्षाहून जास्त असल्यामुळे हे प्रकरण बलात्काराचे ठरत नाही.

सुप्रीम कोर्ट म्हणाले, दोघांतील सहमतीच्या संबंधांमुळे महिलेला दिवस गेले. तिला मूलही झाले, असेही कोर्टाने या प्रकरणी स्पष्ट केले. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी बलात्काराच्या व्याख्येतील अपवादाच्या तरतुदीचा लाभ देत आरोपी पतीची बलात्काराच्या आरोपातून निर्दोष सुटका केली.

बातम्या आणखी आहेत...