आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Supreme Court Issues Contempt Notice To 6 Firecracker Companies; News And Live Updates

सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी:बंदी असूनही फटाक्यांत रसायन वापरणाऱ्या कंपन्यांवर कारवाई; सुप्रीम कोर्टाची 6 फटाके कंपन्यांना अवमानना नोटीस

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ... तेव्हा कारवाई का नाही?

फटाके तयार करताना हानिकारक रसायनाचा वापर करू नये, असा आदेश देऊनही त्याचा वापर करणाऱ्या कंपन्यांवर सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली. सीबीआयने बुधवारी कोर्टाला सांगितले, ६ फटाके कंपन्यांनी प्रतिबंधित रसायनाचा वापर फटाक्यांत केला.

काेर्टाने हा प्रकार गांभीर्याने घेत या कंपन्यांना अवमानना नोटीस जारी केली. पुढील सुनावणी ६ आॅक्टोबरला होईल. प्रदूषणावर नियंत्रणासाठी फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना २०१८ मध्ये कोर्टान फटाके विक्रीवर बंदी घातली होती.

... तेव्हा कारवाई का नाही?
बुधवारी सादर सीबीआय अहवालाची दखल घेत न्या. शहा म्हणाले,‘आम्ही या सहा कंपन्यांचा परवाना रद्द करण्याबाबत विचार करू. कंपन्यांनी आमच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचे चौकशीत आढळले तेव्हा गुन्हा दाखल का करण्यात आला नाही? दंडात्मक कारवाई का झाली नाही? फटाक्यांमुळे अस्थमाच्या आणि श्वसनासंबंधीच्या रोग्यांना त्रास होतो. प्रत्येक सण, लग्न समारंभ, मिरवणूक आणि इतर प्रसंगी फटाके फोडले जातात. लोक त्रस्त होतात. पण कोणालाही त्याचे काही देणे-घेणेच नाही.’

बातम्या आणखी आहेत...