आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी दिल्ली:राज्यपाल कोश्यारी यांच्यावरील अवमानना कारवाईला स्थगिती, सर्वोेच्च न्यायालयाची उत्तराखंड सरकारला नोटीस

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात अवमानना कारवाईच्या नोटिसीला सर्वोेच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. कोश्यारी यांना दिलेल्या सरकारी बंगल्याचे बाजारभावाने भाडे न दिल्यामुळे उत्तराखंड हायकोर्टाने ही नोटीस जारी केली होती.

न्यायमूर्ती रोहिंग्टन फली नरिमन, के. एम. जोसेफ आणि कृष्ण मुरारी यांच्या पीठाने कोश्यारी यांच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी करताना उत्तराखंड सरकारला नोटीस जारी केली. अशाच प्रकारच्या दुसऱ्या याचिकेशी ही नोटीस जोडण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये माजी मुख्यमंत्री म्हणून सरकारी निवासस्थान वाटप करण्याचा निर्णय उत्तराखंड हायकोर्टाने अवैध ठरवला होता. हायकोर्टाने माजी मुख्यमंत्र्यांकडून बाजारभावाने भाडे वसूल करण्याचा आदेश जारी केला होता. या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. आदेशाचे पालन न केल्याबद्दल हायकोर्टाने कोश्यारी यांना अवमानना प्रकरणात नोटीसही जारी केली होती.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser