आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Supreme Court Justice D Y Chandrachud Share A Experience In Corona Positive Situation; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:कार्यालयातच अठरा दिवस विलगीकरणात राहिलो; पत्नी, मी वेगवेगळे पॉझिटिव्ह निघालो, म्हणून घरी जाणे टाळले : न्या. चंद्रचूड

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुप्रीम कोर्टात सुनावणीदरम्यान न्यायाधीश, वकिलांनी सांगितले कोरोनाचे अनुभव
  • कोरोनाविरोधातील आपल्या लढाईचाही केला उल्लेख

पवन कुमार देशभरात कोरोना महामारीची दुसरी लाट सुरू आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि वरिष्ठ वकिलांमधील चिंता व त्यांच्यातील चर्चा मंगळवारी एका सुनावणीदरम्यान ऐकायला व पाहायला मिळाली. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी कोरोनाला हरवण्याबाबतचे त्यांचे अनुभव कथन केले. त्यांनी सांगितले की ते १८ दिवस त्यांच्या कार्यालयातच आयसोलेट राहिले. या काळात त्यांच्याजवळ तणाव पळवण्यासाठी जर कोण हाेते तर ती पुस्तके होती, त्यांनी पुरेपूर सहकार्य केले. सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एम. आर. शहा यांच्या पीठासमोर पश्चिम बंगालमधील बेकायदा कोळसा खाणींवरील एका प्रकरणाची सुनावणी सुरू होती.

खटल्यातील एका आरोपीच्या जामीन अर्जावर आरोपीच्या वतीने उपस्थित ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ लुथरा यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी ते कोरोनाबाधित झाले होते आणि नुकतेच कोरोनाबाबत एक संशोधन आले आहे. त्या संशोधनानुसार ते स्वत:ला इतरांच्या तुलनेत सुरक्षित समजत आहेत. यावर न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी त्यांच्या संघर्षाचा उल्लेख करत सांगितले की, कुटुंबातील इतर कोणताही सदस्य बाधित होऊ नये असे मला वाटत होते. मात्र नंतर माझी पत्नीदेखील कोरोनाने बाधित झाली. त्या वेळी मी बरा होत होतो. म्हणून मला माझ्या घरी परत जायचे नव्हते. या काळात माझे मन शांत ठेवण्यासाठी माझ्याकडे एकच पर्याय होता आणि तो होता माझी पुस्तके, त्यांच्याकडून मला खूपच मदत झाली.

यानंतर ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले की, गेल्या वर्षी जूनमध्ये मला कोरोना संसर्ग झाला होता. त्यातून बरा झाल्यानंतर शरीरात अँटिबॉडी तयार झाल्या आणि आता मी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. यामुळे मला तिप्पट संरक्षण मिळाले आहे. ज्येष्ठ विधिज्ञ दुष्यंत दवे यांनी सांगितले की, ते कोरोनाच्या संसर्गापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात एकटेच राहतात. स्वत:च दिवे लावतात. आपल्याच कार्यालयात एकटे राहणे एखाद्या वकिलासाठी खूपच कंटाळवाणे आहे. कोणीही आत येत नाही आणि बाहेरही जात नाही.

सर्वांचे लसीकरण लवकर होवो अशी देवाला प्रार्थना - न्यायमूर्ती चंद्रचूड
जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान ज्येष्ठ विधिज्ञ महावीर सिंह म्हणाले की, हे प्रकरण पुढच्या सुनावणीच्या वेळी प्रत्यक्ष न्यायालयात ऐकले जावे, अशी देवाला प्रार्थना करतो. यावर हजरजबाबीपणासाठी प्रसिद्ध न्या. चंद्रचूड यांनी सांगितले की, लवकरात लवकर सर्वांचे लसीकरण व्हावे व त्यानंतरच सर्वोच्च न्यायालयात प्रत्यक्ष सुनावणी सुरू व्हावी, अशी माझीही देवाकडे प्रार्थना आहे. दुसरीकडे, सुटीच्या काळातील पीठासमोर येणाऱ्या अनावश्यक प्रकरणांवर न्या. चंद्रचूड व न्यायमूर्ती एम. आर. शहा यांच्या पीठाने नाराजी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...