आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'द केरला स्टोरी चित्रपट देशभर सुरू असताना तुम्हाला काय अडचण?', असा तिखट सवाल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी पश्चिम बंगाल व तामिळनाडू सरकारला केला. कोर्टाने या प्रकरणी दोन्ही राज्यांना नोटीस बजावली आहे. पश्चिम बंगालमध्ये 12 मे रोजी 'द केरला स्टोरी' चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. तर तामिळनाडूतील थिएटर ऑपरेटर्सनी हा चित्रपट न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.
चित्रपटाच्या निर्मात्यांनी या बंदीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्ट म्हणाले - 'पश्चिम बंगाल देशाबाहेर नाही. देशातील इतर राज्यांमध्ये हा चित्रपट शांततेत सुरू असताना बंगाल व तामिळनाडूमध्ये त्यावर बंदी का? चित्रपट पाहायचा की नाही हे प्रेक्षकांवर सोडले पाहिजे. दोन्ही राज्यांची भौगोलिक स्थिती इतर राज्यांसारखीच आहे. मग तिथे चित्रपट का दाखवला जात नाही. हे प्रकरण कलेच्या स्वातंत्र्याचे आहे.'
आता पुढील सुनावणी बुधवारी
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड व न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी बुधवारपर्यंत स्थगित केली. 'द केरला स्टोरी'च्या प्रोडक्शन टीमतर्फे युक्तिवाद करताना ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे म्हणाले- 'बंगालमध्ये कोणतीही अडचण नसताना चित्रपटावर बंदी घालण्यात आली. तिथे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 3 दिवस शांततेत चालला. तमिळनाडूमध्येही हीच परिस्थिती होती. पण तिथे चित्रपटावर आंशिक बंदी घालण्यात आली आहे.'
दुसरीकडे, बंगाल सरकारच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ डॉ. अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा गुप्तचरांकडून अहवाल राज्याला मिळाला होता.
बंगालमध्ये ८ मे रोजी घालण्यात आली होती बंदी
योगींनी संपूर्ण मंत्रिमंडळासह चित्रपट पाहिला
आज केरला स्टोरी चित्रपटाचे स्क्रिनिंग लखनऊतील लोक भवनात आयोजित करण्यात आले होते. त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या मंत्रिमंडळासह हा चित्रपट पाहिला. एक दिवस अगोदरच निर्मात्यांनी योगींची भेट घेतली होती. चित्रपटाचे निर्माते विपुल अमृतलाल शाह यांनी एएनआयशी बोलताना सांगितले होते – योगींनी चित्रपट करमुक्त करून आमचे मनोधैर्य उंचावले. त्यांनी आमची विचारसरणी मजबूत केली. त्याचे खूप आभार.
काय आहे चित्रपटाचे कथानक, का सुरू आहे वाद?
द केरला स्टोरी हा चित्रपट सुदिप्तो सेन यांनी दिग्दर्शित केली आहे. हा चित्रपट त्याच्या कथेवरून वादात सापडला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही गेले. पण न्यायालयाने चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यास नकार दिला. चित्रपटाची कथा मुलींच्या धर्मांतरावर आधारित आहे.
सुदिप्तो यांनी दैनिक दिव्य मराठीशी संवाद साधताना म्हणाले - एका बिंदूनंतर मला जाणवले की हे सर्व एका पॅटर्नअंतर्गत घडत आहे. आधी लोकांना घाबरवा. हिंदू देवतांना बदनाम करा. केरळमध्ये एक संस्था आहे, तिथे 10 मुलींचा अतोनात छळ झाला. मी त्यांची मुलाखत घेतली.
तेथून निमिषा, फातिमाची केस मला समजली. धर्मांतराची प्रक्रिया व त्याचे परिणाम सुनियोजित षडयंत्राखाली होत असल्याचे लक्षात आले. केरळमध्ये मुस्लिमांची संख्या सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने नेते व सरकारही या मुद्द्यावर काही बोलत नाहीत.
आठवडाभरातच चित्रपट ब्लॉकबस्टर
द केरला स्टोरी अजूनही भरमसाठ कमाई करत आहे. या चित्रपटाने रिलीजच्या 7 व्या दिवशी 12.50 कोटींची कमाई केली. त्यामुळे या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 81.36 कोटींवर पोहोचले आहे. चित्रपटाची कमाई पाहता येत्या 2-3 दिवसांत हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो. 30 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने त्याची किंमत अगोदरच वसूल केली आहे.
आता हा चित्रपट नफ्याच्या पलीकडे गेला आहे. त्यावर बंदीचा कोणताही परिणाम दिसून येत नाही. यूपी व एमपीनंतर आता उत्तराखंड व हरियाणा सरकारनेही चित्रपट करमुक्त केला आहे. त्यामुळे कमाईत अधिक भर पडताना दिसून येत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.