आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना चाचण्या:कोरोना व्हायरसवर सुप्रीम कोर्टाचा सल्ला- संक्रमित रुग्णांची ओळख पटवण्यासाठी केल्या जाणाऱ्या सर्व चाचण्या मोफत करा

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्राने सुप्रीम कोर्टाला सांगितले- देशभरात 118 लॅबमध्ये दररोज 15 हजार टेस्ट केले जात आहेत

सुप्रीम कोर्टाने बुधवारी केंद्र सरकारला सल्ला दिला आहे की, कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची ओळख पटवण्यासाठी केल्या जाणाऱ्या सर्व चाचण्या मोफ कराव्यात. जस्टिस अशोक भूषण यांच्या बेंचने केंद्राला सांगितले की, असे एखादे तंत्रज्ञान विकसित करा, ज्यामुळे टेस्टसाठी लोकांकडून घेतलेली फीस वापर करता येईल. जस्टिस अशोक भूषण आणि जस्टिस एस रवींद्र भट यांच्या बेंचला केंद्राने सांगितले की, देशभरात 118 लॅबमध्ये दररोज 15 हजार चाचण्या केल्या जात आहेत आणि आम्ही याची क्षमता वाढवण्यासाठी 47 खासगी लॅबला चाचण्यांची परवानगी देत आहोत. डॉक्टर आणि स्टाफवर होणाऱ्या हल्ल्यांना पाहता सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की, डॉक्टर आपले कोरोना वॉरियर्स आहेत, त्यांना सुरक्षा पुरवली जावी. सुप्रीम कोर्टात अॅडवोकेट शशांक देव सुधि यानी याचिका दाखल करुन म्हटले होते की, कोर्टाने केंद्र आणि अधिकाऱ्यांना निर्देश द्यावे की, कोरोना व्हायरसच्या चाचण्या मोफत कराव्यात.

किती लॅब लागतील, याचा नेमका आकडा सांगता येत नाही- केंद्र
मेहता म्हणाले की, सध्या दिवसेंदिवस परिस्थिती बदलत आहे. अशा वातावरणात किती लॅब लागतील आणि लॉकडाउन किती दिवस चालेल याची माहिती सांगणे अशक्य आहे. यावर बेंचने म्हटले की, खासगी लॅब चाचण्यांसाठी जास्त पैसे आकारु नयेत, यासाठी केंद्राने यात लक्ष घालायला हवे. तसेच, असे एखादे तंत्रज्ञान तयार करा, जेणेकरुन घेतलेले पैसे त्या व्यक्तीला परत देता येतील.

बातम्या आणखी आहेत...