आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासर्वोच्च न्यायालयाने सोमवारी हेट स्पीच व हेट क्राइमच्या मुद्यावर एक महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. कोर्ट म्हणाले की, भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात धार्मिक आधारावर हेट क्राइम करण्यासाठी कोणतेही स्थान नाही. कोर्टाने यावेळी देशात हेट स्पीच अर्थात द्वेषपूर्ण भाषणांच्या घटना वाढत असल्याचेही स्पष्ट केले. कोर्ट म्हणाले - या प्रकरणी कोणतीही तडजोड करता येत नाही. अशा प्रकरणांतील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची जबाबदारी राज्याची आहे.
2021 मध्ये नोएडातील 62 वर्षीय काझीम अहमद शेरवाणी हेट क्राइमला बळी पडले होते. या प्रकरणी सुनावणी करताना न्यायमूर्ती के एम जोसेफ यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने ही टिप्पणी केली.
SC म्हणाले - हेट क्राइमला कारपेटखाली दाबता येत नाही
हेट स्पीचच्या वाढत्या प्रकरणांविषयी सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली. ही सुनावणी सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालली. कोर्ट म्हणाले की, राज्याने अभद्र भाषेची समस्या मान्य केली तरच तिच्यावर तोडगा काढता येतो. याशिवाय न्यायालयाने पोलिसांना प्रश्न केला की, हेट क्राइम ओळखले जाणार की ते दडपण्याचा प्रयत्न केला जाणार? हा द्वेषाचा गुन्हा आहे. तुम्ही ते कार्पेटखाली दाबून टाकणार का?
धर्माच्या नावाने एखाद्याला मारहाण केल्यानंतर केस न होणे एक समस्या
एखादा व्यक्ती पोलिसांकडे आला व मी टोपी घातल्यामुळे माझी दाढी खेचून शिवीगाळ करण्यात आली असे म्हणाला. त्यानंतरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही, तर ही एक समस्या आहे. अशा पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे. पोलिस ठाण्यात येणाऱ्यांच्या मनात गुन्हेगाराची भावना निर्माण होता कामा नये, असे कोर्ट म्हणाले.
2 वर्षांपूर्वी मुस्लिम असल्यामुळे झाली होती मारहाण
2021 मध्ये 62 वर्षीय व्यक्तीने आपल्या याचिकेत आरोप केला होता की, 4 जुलै रोजी तो नोएडाच्या सेक्टर 37 मध्ये अलीगडला जाणाऱ्या बसची वाट पाहत होता. तेव्हा काही लोकांनी त्यांना लिफ्ट देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर त्यांनी मुस्लिम असल्यामुळे त्याला मारहाण करत शिवीगाळ केली. पीडित नोएडाच्या सेक्टर 37 मध्ये एका पोलिस ठाण्यात गेला. तिथे सीनियर पोलिस अधिकारी नव्हते. केवळ कॉन्स्टेबल उपस्थित होता. त्यामुळे कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.