आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Supreme Court On Kerala Class 11 Exam And COVID Death Certificate Guidelines | All You Need To Know; News And Live Updates

कोरोनाबाबत सर्वोच्च न्यायालय कठोर:केरळमध्ये 11 वीची परीक्षा घेण्यावर बंदी, कोरोना मृत्यू प्रमाणपत्र आणि भरपाईवरुन केंद्र सरकारला फटकारले

नवी दिल्ली20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केरळ कोरोनाचा हॉटस्पॉट, देशातील 76 टक्के प्रकरणे या राज्यात

देशातील कोरोनाच्या नवीन प्रकरणात पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे, केरळ राज्यात कोरोनाची चिंताजनक परिस्थिती आहे. देशातील 76 टक्के नवीन प्रकरणे एकट्या केरळ राज्यात आढळत आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने केरळ राज्यात 6 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या 11 वीच्या परिक्षेवर बंदी घातली आहे.

राज्य सरकारने 6 सप्टेंबरपासून राज्यभरात 11 वीची परीक्षा शारीरिकरीत्या घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, राज्यातील कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या या निर्णयाला अंतरिकम स्थगिती दिली आहे. राज्यातील वाढत्या प्रार्दुभावामुळे मुलांचे आयुष्य धोक्यात घालता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने यावेळी म्हटले आहे.

केरळ कोरोनाचा हॉटस्पॉट, देशातील 76 टक्के प्रकरणे या राज्यात
कोरोनाबाधितांची संख्या देशात झपाट्याने वाढत असलेले केरळ एकमेव राज्य आहे. केरळात एका दिवसातील रुग्णसंख्या 32 हजारांच्या घरात पोहोचली आहे. देशातील 76 टक्के रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत. महाराष्ट्र मृतांत पुढे आहे. एका दिवसात सर्वाधिक 183 मृत्यू नोंदवण्यात आले. बुधवारी देशात सुमारे 46 हजार रुग्ण आढळले व 509 मृत्यू झाले. त्यापैकी 32 हजार 694 रुग्ण एकट्या केरळात आढळून आल्याने प्रशासन चकित झाले. राज्यात 173 जणांचा मृत्यू झाला.

कोरोना मृत्यू प्रमाणपत्र आणि भरपाईवरुन केंद्र सरकारला फटकारले
कोरोना काळात अनेक लोकांना आपले जीव गमावावे लागले. कोरोना मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार करण्यास केंद्र सरकारला विलंब लागला. यामुळे अनेक लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. यावरुन सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला चांगलेच फटकारले आहे. न्यायमूर्ती एम आर शाह आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या दुहेरी खंडपीठाने 11 सप्टेंबरपर्यंत अहवाल दाखल करण्याचे निर्देश केंद्राला दिले आहे.

...तोपर्यंत तिसरी लाटही संपेल
आम्ही याबाबत खूप दिवसापूर्वी आदेश जारी केला असून एकदा मुदतही वाढवली. तुम्ही मार्गदर्शक तत्वे तयार करेपर्यंत देशातील कोरोनाची तिसरी लाटही निघून जाईल असे खंडपीठाने म्हटले आहे. न्यायालयाने यापूर्वी 30 जून रोजी जारी केलेल्या आदेशात म्हटले होते की, मृत्यू प्रमाणपत्रावर मृत्यूचे नेमके कारण दिले पाहिजे. जर मृत्यू कोविड -19 मुळे झाले असेल तर भविष्यात त्यांना या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळू शकेल. जेणेकरुन मृतांवर अवलंबून असलेल्या लोकांना सक्षम करता येईल असे न्यायालयाने म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...