आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फटाक्यांवरील बंदीशी संबंधित याचिका:आवाजी फटाकेच नव्हे, फुलबाज्यांनीही आनंद साजरा करता येतो : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंपन्यांचा युक्तिवाद : फटाक्यांवरील बंदीमुळे लोक बेरोजगार होतील
  • हरित फटाक्यांच्या आडून प्रतिबंधित साहित्याचा वापर : कोर्टाची टिप्पणी

आनंदोत्सव साजरा करण्याचा अर्थ फक्त जोरदार आवाज करणारे फटाके फोडणे असा नव्हे, फुलबाज्यांसारख्या आवाज न करणाऱ्या लहान फटाक्यांद्वारेही आनंद साजरा केला जाऊ शकतो, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. फटाक्यांवरील बंदीशी संबंधित याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाने ही कठोर टिप्पणी केली. कोर्टाने म्हटले,‘ देशात मुख्य समस्या बंदी लागू करण्याची आहे. कुठलीही व्यक्ती कोणत्या एका वर्गाला नाखूश करू इच्छित नाही.’

न्यायमूर्ती एम. आर. शहा आणि ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठाने गुरुवारी म्हटले,‘हरित फटाक्यांच्या आडून फटाके निर्माते प्रतिबंधित साहित्याचा वापर करत आहेत. प्रतिबंधित फटाक्यांबाबतच्या आमच्या आदेशाचे सर्व राज्यांनी पालन करायला पाहिजे, पण कोणत्याही राज्यात, शहरात गेल्यानंतर प्रतिबंधित फटाक्यांची खुलेआम विक्री होत असल्याचे दिसते. आनंद साजरा करण्यासाठी अशा प्रकारच्या फटाक्यांचा वापर होत आहे. बंदी असताना हे फटाके बाजारात कसे उपलब्ध आहेत, हे जाणून घ्यायचे आहे. निर्मात्यांचे म्हणणे आहे की, आम्ही फटाके गोदामांत ठेवत आहोत, पण गोदामांत कशासाठी ठेवत आहेत? तुम्हाला गोदामांत ठेवण्याची परवानगी देणार नाही.’ पुढील सुनावणी २६ ऑक्टोबरला होईल.

असे आहे प्रकरण : कोर्टाने सीबीआयद्वारे चौकशी केली होती
२०१८ मध्ये सुप्रीम कोर्टाने फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली होती. गेल्या वर्षी आदेशाचा अवमान झाल्याचे समोर आल्यानंतर कोर्टाने सीबीआयद्वारे चौकशी करून घेतली. त्यात ६ कंपन्यांनी बेरियम साल्टचा वापर केल्याचा मुद्दा समोर आला. त्यावर कोर्टाने कंपन्यांकडून उत्तर मागितले होते.

बातम्या आणखी आहेत...