आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'रेपिस्ट' ABVP नेत्याच्या होर्डिंग्जवर SC नाराज:नोटीस बजावत कोर्ट म्हणाले -हे 'भैय्या इज बॅक'चे बॅनर का लावले?  तुमच्या भावाला आठवडाभर काळजी घ्यायला सांगा

जबलपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
शुभांग गोटियावर एका 23 वर्षीय विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्याला गत नोव्हेंबरमध्ये हाय कोर्टाने जामीन मंजूर केला होता.  - Divya Marathi
शुभांग गोटियावर एका 23 वर्षीय विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्याला गत नोव्हेंबरमध्ये हाय कोर्टाने जामीन मंजूर केला होता. 

सर्वोच्च न्यायालयात सोमवारी अभाविप नेता शुभांग गोटिया याचा जामीन रद्द करण्याच्या मुद्यावर सुनावणी झाली. गोटियावर एका 23 वर्षीय विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. यावेळी न्यायालयाने आरोपीच्या सुटकेनंतर 'भैय्या इज बॅक'चे होर्डिंग लावल्याप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली. हे होर्डिंग मकर संक्रांतीला लावण्यात आले होते. सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा, न्यायमूर्ती कृष्ण मूरारी व न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने या प्रकरणी मध्य प्रदेश सरकारकडूनही स्पष्टीकरण मागितले आहे.

सुप्रीम कोर्टाने एका नोटीसीद्वारे शुभांग गोटिया यांना तुमचा जामीन रद्द का केला जाऊ नये असा सवाल केला आहे. हे भैय्या इज बॅकची बॅनरबाजी का केली? तुम्ही आनंद साजरा करत आहात काय? तुमच्या भैय्याला आठवडाभर काळजी घ्यायला सांगा, असे सरन्यायाधीश गोटिया यांच्या वकिलांना उद्देशून म्हणाले.

सरन्यायाधीशांच्या नेतृत्वातील खंडपीठाने या प्रकरणी मध्य प्रदेश सरकारकडूनही स्पष्टीकरण मागितले आहे. या प्रकरणी पीडितेने वकील वैभव मनु श्रीवास्तव व शिखा खूराणा यांच्या माध्यमातून याचिका दाखल करुन आरोपी शुभांग गोटिया याला जबलपूर हाय कोर्टाने दिलेला जामीन रद्द करण्याची मागणी केली आहे.

हाय कोर्टाचे आरोपीच्या इतिहासाकडे दुर्लक्ष

याचिकेत पीडितेने म्हटले की, हाय कोर्टाने या खटल्यातील वस्तुस्थिती व गांभिर्याकडे दुर्लक्ष केले. आरोपीचा इतिहासही पाहिला नाही. आरोपी प्रभावशाली व्यक्ती आहे. त्याचे काही पोस्टरही याचिकेसोबत जोडण्यात आलेत. त्या भैय्या इज बॅक असा नारा लिहिण्यात आला आहे. कोर्ट या प्रकरणी 18 एप्रिलला पुन्हा सुनावणी करणार आहे.

जबलपूर स्थित पीडितेने गतवर्षी 21 जून रोजी महिला पोलिस ठाण्यात शुभांग विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.
जबलपूर स्थित पीडितेने गतवर्षी 21 जून रोजी महिला पोलिस ठाण्यात शुभांग विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.

काय आहे प्रकरण?

28 वर्षीय शुभांग गोटिया याची 23 वर्षीय पीडितेशी 2018 मध्ये महाविद्यालयात मैत्री झाली होती. हळूहळू त्याचे प्रेमात रुपांतर झाले. शुभांग तिला अनेक ठिकाणी फिरावयास घेऊन गेला. एक दिवस त्याने तिच्या माथ्यावर कुंकू लाऊन ती आता आपली पत्नी असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने तिच्याशी अनेकदा शारिरीक संबंध प्रस्थापित केले. पीडितेने त्याच्याकडे लग्न करण्याची मागणी केली असता त्याने नकार दिला.

शुभांग गोटियाने 6 महिन्यांपूर्वी महिला पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले होते. विद्यार्थीनीच्या कुटूंबियांनी गोटिया याच्यावर पीडितेचा जबरी गर्भपात केल्याचाही आरोप केला आहे.