आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराव्यापम घोटाळ्यातील व्हिसल ब्लोअर डॉ. आनंद राय यांच्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने राय यांना तपास पूर्ण झाल्यानंतर कायद्यानुसार आरोपपत्राला आव्हान देण्याची परवानगी दिली. 'राय यांना अटकेनंतर जामीन मिळाल्यामुळे या प्रकरणात अटकेपासून अभय कसे द्यावे?', असे कोर्ट म्हणाले. यावेळी न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड यांनी एक महत्वपूर्ण निरिक्षण नोंदवले. ते म्हणाले, 'हे प्रकरण अटकेचे नाही. फेसबूक पोस्टमध्ये 'र' ला 'क' म्हटले गेले तर त्यामुळे मानहाणी कशी होते? हे प्रकरण विनाअट माफी मागण्याचे आहे.'
कोर्टाची प्रश्नांची सरबत्ती
न्या. चंद्रचूड यांनी आनंद राय यांच्या याचिकेवर सुनावणी करताना तक्रारकर्त्याला त्या फेसबूक पोस्टचा प्रत्यक्षात अर्थ काय होतो? पोस्टमध्ये आक्षेपार्ह काय आहे? असे विविध प्रश्न विचारले. त्यावर पोस्टमुळे भावना दुखावलेल्या तक्रारकर्त्याने आपले नाव 'मरकम' आहे, पण पोस्टमध्ये हेतुपुरस्सर 'मटकम' असे लिहिण्यात आल्याचा दावा केला. 'मटकम'चा अर्थ 'नपुंसक' असा होतो. आनंद राय यांनी हे सर्वांना पाठवले. मी अनुसूचित जाती/जमातीशी संबंधित आहे. हे एक गैरवर्तन आहे. आता काहीच राहिले नाही. ते आता जामिनावर आहेत. न्यायालयाने या प्रकरणाच्या तपासात हस्तक्षेप होणार नाही याची काळजी घ्यावी. राय एका राजकीय पक्षाशी संबंधित असून, त्याच्या स्वतःच्या काही महत्वकांक्षा आहेत,' असे ते म्हणाले.
राय यांना आरोपपत्राला आव्हान देण्याची सूट
त्यावर न्या. चंद्रचूड म्हणाले -'आम्हाला वाटले हे प्रकरण अटकेपासून अभय देण्याचे आहे. पण, याचिकाकर्त्याला अटक व सुटका झाली आहे. न्यायालय त्यांना आरोपपत्र दाखल झाल्यानंतर आव्हान देण्याची सूट देईल.'
आनंद राय यांच्यावतीने विवेक तन्खा यांनी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्याकडे या प्रकरणाची तत्काळ सुनावणी घेण्याची मागणी केली होती. आनंद राय यांनी एका याचिकेद्वारे MP TET पेपर लिक प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांना दिल्लीत अटक झाली. राय यांना भोपाळच्या गुन्हे शाखेने दिल्लीतील एका हॉटेलमधून अटक केली. आता ते त्यांना घेऊन भोपाळला रवाना झालेत, असे तन्खा यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते.
काय आहे प्रकरण?
TET पेपर लिक प्रकरणात आनंद राय व के. के. मिश्रा यांनी मरकम यांच्यावर सार्वजनिकपणे आरोप केले होते. त्यानंतर मरकम यांनी 27 मार्चला अजाक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण गुन्हे शाखेला सुपूर्द केले होते. तत्पूर्वी, आनंद राय यांनी टीईटी च्या व्हायरल स्क्रीनशॉट प्रकरणी मरकाम यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 'स्क्रीनशॉट मरकाम यांच्या मोबाइलमध्ये कशी आली?', असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला होता. त्यानंतर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनीही ही परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.