आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी आरोपी गौतम नवलखा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी त्यांना एका महिन्यासाठी तळोजा तुरुंगातून काढून नवी मुंबई येथील त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी न्यायालयाने काही अटीही ठेवल्या आहेत.
न्यायालयाच्या आदेशानुसार, नजरकैदेत असताना नवलखा यांना कोणत्याही प्रकारचे टेलिकम्युनिकेशन म्हणजेच लॅपटॉप, मोबाइल, कॉम्प्युटर आदी उपकरणांचा वापर करता येणार नाही. माध्यमांशी संवाद साधता येणार नाही. या प्रकरणाशी संबंधित साक्षीदार किंवा कोणत्याही व्यक्तीशीही चर्चाही करता येणार नाही. न्यायालयाने नवलखा यांच्या पार्टनर सहबा हुसेन यांना त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी दिली आहे. तसेच त्यांना पोलिसांनी उपलब्ध करून दिलेल्या मोबाइल फोनवरून दररोजच ५ मिनिटे कुटुंबीयांशी संवाद साधता येईल. एनआयएतर्फे युक्तिवाद करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी नवलखांच्या यांच्या नजर कैदेला विरोध केला होता.
काय आहे प्रकरण?
पुण्यातील शनिवारवाड्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषद झाली होती. त्यात कबीर कला मंचाच्या बॅनरखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांनी या कार्यक्रमात नक्षली साहित्यांचे वाटप झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतरच कोरेगाव भीमा हिंसाचार भडकल्याचा दावाही केला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.