आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Supreme Court Petition For Restrictions On Tabligi Tribe Movements; Demand For Court To Demolish Merkaj Building

कोरोना:तबलिगी जमातच्या हालचालींवर निर्बंधांसाठी सुप्रीम कोर्टात याचिका; मरकज इमारत पाडण्याची कोर्टाकडे मागणी

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • देशात दीड हजार जमाती बाधित

देशात कोरोनाचा संसर्ग पसरवण्यात मोठे कारण बनलेल्या तबलिगी जमातच्या हालचालींवर निर्बंधांचे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात पोहोचले आहे. एका पत्र याचिकेद्वारे तबलिगी जमातच्या हालचालींवर निर्बंध व निजामुद्दीन येथील मुख्यालयाची इमारत पाडण्याची मागणी केली आहे. संसर्ग वाढवण्यामागे जमातचे काही षड‌्यंत्र आहे का, याचा तपास सीबीआयमार्फत करण्याची मागणीही केली आहे. दिल्लीच्या अजय गौतम यांनी याचिकेत म्हटले की, तबलिगीच्या निष्काळजीपणामुळे देशभरात बाधितांची संख्या वाढली आहे. ते लोक अजूनही पोलिस आणि सरकारशी सहकार्य करत नाहीत. पोलिस आणि डॉक्टरांवर हल्ले होत आहेत. ते त्यांच्यावर थुंकत आहेत.

देशात दीड हजार जमाती बाधित

मुंबई पोलिसांनी मरकजहून परतलेल्या १५० जणांवर निष्काळजीपणाचे गुन्हे दाखल केले आहेत. १६ जमातींवर गुन्हे दाखल झाले. इंडोनेशियाचे तेलंगणात बाधित सापडले १० नागरिक आणि दिल्लीत क्वॉरंटाइन केंद्रात उघड्यावर शौच करणाऱ्या दोन जमातींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
हरियाणात मंगळवारी २२ आणि कर्नाटकात ४ जमाती बाधित आढळले. आतापर्यंत सुमारे दीड हजार जमाती बाधित आढळले आहेत.  तर २५ हजारांहून अधिक जमाती आणि त्यांच्या संपर्कात आलेले लोक क्वॉरंटाइन आहेत. पंजाबने जमातींना २४ तासांत समोर येण्यास सांगितले आहे. त्यांना पकडण्यात आले तर कारवाई केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...