आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरूंना देव घोषित करण्यासाठी सुप्रीम कोर्टात पोहोचला शिष्य:कोर्ट म्हणाले- दुसऱ्यांवर का थोपवता; 1 लाखांचा दंडही ठोठावला

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे प्रकरण न्यायमूर्ती एमआर शहा आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांच्या खंडपीठात नोंदवण्यात आले होते.

सर्वोच्च न्यायालयात सोमवारी एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. एका शिष्याने आपल्या गुरूला देव घोषित करण्यासाठी चक्क सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका टाकली. पण ही जनहित याचिका न्यायमूर्ती एम. आर. शहा आणि न्यायमूर्ती सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठाने फेटाळली आहे. याचबरोबर याचिकाकर्त्याला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

शिष्याने अशी मागणी का केली? वाचा सविस्तर
याचिकाकर्ता उपेंद्र नाथ दलाई हे श्री. श्री. अनुकुल चंद्र ठाकूर यांचे शिष्य आहेत. श्री श्री ठाकूर यांचे धर्म-समाजातील योगदान पाहता सर्वोच्च न्यायालयाने त्यांना देव मानण्याचे निर्देश द्यावेत, अशी उपेंद्रनाथ दलाई यांची मागणी होती. भाजप, आरएसएस, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, गुरुद्वारा बांगला साहिब, इस्कॉन कमिटी, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, नॅशनल ख्रिश्चन कौन्सिल यांनाही उपेंद्र यांच्या याचिकेत पक्षकार करण्यात आले होते.

कोण आहेत अनुकुलचंद्र चक्रवर्ती- श्री श्री ठाकूर या नावाने प्रसिद्ध

अनुकुल चंद्र चक्रवर्ती हे देवघर येथील सत्संगाचे ते संस्थापक होते. अनुकुलचंद्र यांचे 27 जानेवारी 1969 रोजी निधन झाले. भारत सरकारने 1987 मध्ये त्यांच्या नावाने एक मेमो टपाल तिकीट जारी केले होते.

कोर्ट आपल्या आदेशात काय म्हटले?

  • याचिका फेटाळताना न्यायालयाने सांगितले की- भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. याचिकाकर्त्याला अशी परवानगी मुळीच दिली जाऊ शकत नाही. जे श्री श्री अनुकुलचंद्र यांना देव मानण्यास भाग पाडण्याची परवानगी दिली जाई शकत नाही.
  • न्यायमूर्ती शहा म्हणाले की, तुम्हाला जर त्यांना देव मानायचे असेल तर तुम्ही खुशाल माना. पण ते तुम्ही इतरांवर लादू शकणार नाही. आम्ही तुमचे व्याख्यान ऐकण्यासाठी आलो नाही तर तुम्हाला सुनावण्यासाठी आलो आहोत. आपण धर्मनिरपेक्ष देशात राहतो. आपला देश धर्मनिरपेक्ष आहे.
  • तुमचा विश्वास आहे की, एकच गुरजी आहेत.. असं कधी होतं का भाऊ? या देशात प्रत्येकाला पूर्ण अधिकार आहेत. तुम्हाला कोणताही धर्म पाळायचा असेल तर तो पाळा.

दंड ठोठावताना म्हणाले- आता लोक ४ वेळा विचार करतील
शिष्याच्या युक्तिवादानंतर न्यायालयाला ही याचिका जनहिताची वाटली नाही. त्यामुळे त्या याचिकाकर्त्याला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. उपेंद्र यांनी दंड न लावण्याच्या विनंतीवर न्यायमूर्ती शाह म्हणाले की, आम्ही कमी दंड ठोठावला आहे. जनहित याचिकांचा गैरवापर करण्याचा अधिकार कोणालाही नाही. आता लोक अशी याचिका करण्यापूर्वी किमान 4 वेळा विचार करतील.

बातम्या आणखी आहेत...