आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चंदा कोचर यांना सुप्रीम कोर्टाचा झटका:ICICI बँकेतून बर्खास्त करण्याविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बँकेने 7.4 कोटी रुपयांचा बोनस परत मागितला

ICICI बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि मॅनेजिंग डायरेक्टर (MD) चंदा कोचर यांना सुप्रीम कोर्टने झटका दिला आहे. ICICI बँकेच्या CEO आणि MD पदावरुन बर्खास्त करण्याविरोधातील कोचर यांची याचिका कोर्टाने मंगळवारी फेटाळून लावली. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळली होती.

याचिकेच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या आदेशात फेरबदल करण्यास नकार दिला. कोर्टाने म्हटले की, हे प्रकरण एक खासगी बँक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांमधील आहे. हे पर्सनल सर्विस कॉन्ट्रॅक्टचे प्रकरण असल्यामुळे कोर्टाने ही याचिका रद्द केली.

काय आहे चंदा कोचर आणि ICICI बँकेतील वाद?

ICICI बँकेच्या CEO आणि MD असताना चंदा कोचरवर 3,250 कोटी रुपयांच्या कर्जात गडबड केल्याचा आरोप आहे. बँकेने त्यांच्यावर पती दीपक कोचरला फायदा मिळून देण्यासाठी व्हिडियोकॉन ग्रुपला कर्ज दिल्याचा आरोप लावला आहे. या आरोपामुळे त्यांना पदापवरुन बर्खास्त करण्यात आले होते. हायकोर्टात दाखल याचिकेत कोचर म्हणाल्या होत्या की, बँकेने त्यांना फेब्रुवारी 2019 मध्ये टर्मिनेशन लेटर दिले. तर, ऑक्टोबर 2018 मध्येच त्यांच्या लवकर रिटायर(व्हीआरएस)चा अर्ज मंजूर झाला होता.

बँकेने 7.4 कोटी रुपयांचा बोनस परत मागितला

कोचर यांनी सांगितल्यानुसार, 30 जानेवारी 2019 ला त्यांना बँकेच्या चीफ एचआर ऑफिसरने सांगितले की, त्यांच्या बँकेतून वेगळे होण्याला बर्खास्तच म्हटले जाईल. बोर्डाने रिटायर्ड जस्टिस बी एन श्रीकृष्णा यांच्या रिपोर्टच्या आधारावर हा निर्णय घेतला होता. यासोबतच, त्यांना एप्रिल 2009 पासून मार्च 2018 पर्यंत मिळालेला बोनसही परत देण्यास सांगण्यात आला. यादरम्यान कोचर यांना 7.4 कोटी रुपये बोनस मिळाला होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser