आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Supreme Court Rejects Chief Justice's Petition I Demand Was To Prevent Him From Taking Oath As CJI, Latest News And Update 

न्यायमूर्ती चंद्रचूडांच्या विरोधातील याचिका SCने फेटाळली:CJIची शपथेपासून रोखण्याची होती मागणी; खंडपीठ म्हणाले- याचिका चूकीची

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी आपल्या ज्येष्ठ न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड यांना 9 नोव्हेंबरला सरन्यायाधीश म्हणून शपथ घेण्यापासून रोखण्याची विनंती करणारी याचिका फेटाळून लावली आहे. तर ही याचिका गैरसमजातून करण्यात आल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितले की, वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, आम्हाला सुनावणीचे कोणतेही कारण दिसत नाही. आम्हाला संपूर्ण याचिका चुकीच्या गृहीतकावर आधारित असल्याचे आढळते.

देशाचे नवे सरन्यायाधीश पदी बसणारे डीवाय चंद्रचूड यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या अर्जात न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांना सरन्यायाधीशपदाची शपथ घेण्यापासून रोखण्याची मागणी करण्यात आली होती. यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, या अर्जात सुनावणी घेण्यासारखे काहीच नाही.

न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड हे 9 नोव्हेंबरला सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत. न्यायमूर्ती यू-यू ललित यांच्या जागी त्यांची देशाचे सरन्यायाधीश म्हणून निवड झाली आहे. एका वकिलाच्या वतीने न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली होती. जी याचिका न्यायमूर्ती रवींद्र भट आणि बेला एम. त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर सादर करण्यात आली होती. न्यायमूर्ती चंद्रचूड हे देशाचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत.

या संबंधित बातमी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांची देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड 9 नोव्हेंबर रोजी शपथ घेणार आहेत. ते देशाचे 50 वे सरन्यायाधीश असतील. त्यांचा कार्यकाळ 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत असेल. ते 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणारे न्यायमूर्ती यूयू ललित यांचे स्थान घेतील. त्यांचे वडील वायव्ही चंद्रचूड हेही देशाचे सरन्यायाधीश राहिले आहेत. वायव्ही चंद्रचूड यांच्या नावावर सर्वाधिक काळ (1978 ते 1985) CJI राहण्याचा विक्रम आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बातम्या आणखी आहेत...