आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी दिल्ली:सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली माजी सीईओ चंदा कोचर यांची याचिका; कोर्ट म्हणाले, तुमच्या प्रकरणात हस्तक्षेपाचा आमचा विचार नाही

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोचर यांचा युक्तिवाद : बरखास्तीआधी आरबीआयकडून परवानगी घेतली नाही

आयसीआयसीआय बँकेच्या बरखास्त सीईओ चंदा कोचर यांना सुप्रीम कोर्टाने झटका दिला. कोर्टाने मंगळवारी कोचर यांना सांगितले, ‘तुमच्या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा आमचा विचार नाही. हे बँक व तिचे कर्मचारी यांच्यातील कराराचे प्रकरण आहे.’ ही टिप्पणी करत कोर्टाने कोचर यांची याचिका फेटाळली.

आयसीआयसीआय बँकेने कोचर यांना सीईओपदावरून बरखास्त केले होते. त्याविरोधात कोचर यांनी दाखल केलेली याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली होती. या आदेशाला त्यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. त्यावर सुप्रीम कोर्ट म्हणाले की, ‘हायकोर्टाच्या आदेशात हस्तक्षेप करण्याचा आमचा कुठलाही विचार नाही.’

कोचर यांचा युक्तिवाद : बरखास्तीआधी आरबीआयकडून परवानगी घेतली नाही
कोचर यांच्यातर्फे मुकुल रोहतगींनी सुप्रीम कोर्टात बाजू मांडली. ते म्हणाले, कोचर यांची बरखास्ती अवैध आहे. त्यासाठी बँकेने आधी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (आरबीआय) मंजुरी घेणे आवश्यक होते, ती घेण्यात आली नाही. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य केला नाही.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser