आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मोहरम मिरवणूक:मोहरमच्या मिरवणुकींना सुप्रीम कोर्टाचा नकार; म्हणाले- कोरोना संसर्गात लोकांना धोक्यात टाकू शकत नाही

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • याचिकाकर्त्याने जगन्नाथ पुरी येथे रथ यात्रेला मंजुरी दिल्याचा युक्तीवाद केला होता
  • कोर्टाने म्हटले आहे - पुरीत निश्चित ठिकाणांमध्ये रथ ओढण्याची बाब होती, धोक्याचा अंदाज होता

येत्या 30 ऑगस्टला मुस्लिम धर्मियांचा मोहरम सण आहे. यावर मुस्लिम बांधवांकडून मोहरमला मातमी जुलूस काढण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली जात होती. मात्र यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने देशात मोहरमच्या दिवशी मातमी जुलूस काढण्यावर बंदी घातली आहे. आज या संदर्भात कोर्टात सुनावणी झाली. सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्या खंडपीठाने म्हटले की, कोरोना संसर्ग वाढलेला आहे. अशा परिस्थितीत लोकांचे आरोग्य धोक्यात टाकू शकत नाही.

उत्तर प्रदेशच्या सय्यद कल्बे जब्बाद यांनी मोहरमच्या दिवशी मिरवणूक (मातमी जुलूस) काढण्यास परवानगी मिळावी म्हणून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. लखनऊमध्ये शिया समुदाय जास्त असल्याने याचिकाकर्त्याने मिरवणुकीसाठी (मातमी जुलूस) परवानगी मागितली. त्यांनी ओडिशाच्या जगन्नाथ पुरी येथे रथयात्रेला परवानगी दिल्याचा संदर्भ दिला होता.

कोर्ट म्हणाले- मिरवणुकीस (जुलूस) परवानगी दिली तर गदारोळ होईल

सय्यद कल्बे जब्बाद यांच्या जगन्नाथ पुरीच्या हवाल्यावर सुप्रीम कोर्ट म्हणाले की, जगन्नाथ पुरीचे प्रकरण वेगळे होते, तिथे रथ एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी न्यायचा होता. अशा निश्चित जागेच्या प्रकरणांमध्ये आम्ही धोक्याचा अंदाज घेऊन आदेश देऊ शकतो. परंतु हा आदेश प्रत्येक बाबतीत दिला जाऊ शकत नाही. सरन्यायाधीश म्हणाले की मिरवणुकीस (मातमी जुलूस) परवानगी दिल्यास गदारोळ होईल आणि एका विशिष्ट समुदायावर कोरोना पसरविल्याचा आरोप लावले जातील. लखनऊमध्ये मिरवणुकीस (मातमी जुलूस) परवानगी घेण्यासाठी तुम्ही अलाहाबाद उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले.