आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Supreme Court Says That Affixing Posters Outside The Homes Of Covid Patients Not Required

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोव्हिड पोस्टरवर सुप्रीम कोर्ट:कोरोना रुग्णांच्या घरांबाहेर कोव्हिडचे पोस्टर लावू नका, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकारचे उत्तर - हा नियम नाही, तर इतरांच्या संरक्षणाची व्यवस्था आहे

कोरोनाचे रुग्ण आणि संशयितांना होम क्वारंटाइन करण्याच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने बुधवारी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोर्टाने म्हटले आहे की लोकांच्या घरासमोर क्वारेन्टाईन पोस्टर्स लावू नका. या प्रकरणातील गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत कोर्टाने म्हटले होते की एकदा कोरोना रूग्णांच्या घरी पोस्टर लावण्यात आले तेव्हा त्यांना अस्पृश्यांप्रमाणे वागवले जाते.

सरकारचे उत्तर - हा नियम नाही, तर इतरांच्या संरक्षणाची व्यवस्था आहे

केंद्र सरकारने न्यायालयात म्हटले की हा आवश्यक नियम नाही, या प्रथेचा हेतू कोरोना रूग्णांना कलंकीत करणे हा नाही, तर ही व्यवस्था इतरांच्या सुरक्षेसाठी आहे. सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, कोरोना संसर्ग रोखण्याच्या प्रयत्नात काही राज्ये ही पद्धत अवलंबत आहेत.

कोर्टाने सांगितले- वास्तव वेगळे आहे
सरकारच्या या उत्तरावर न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती आर सुभाष रेड्डी आणि एमआर शाह यांच्या खंडपीठाने असे सांगितले की, वास्तव काही वेगळे आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने 5 नोव्हेंबरला केंद्र सरकारला म्हटले होते की, कोरोना रुग्णांच्या घराबाहेर पोस्ट लावण्यापासून रोखण्यासाठी गाइडलाइंस जारी करण्यावर विचार करायला हवा. या प्रकरणात पिटीशनर कुश कालरा यांनी ही अपील केली होती. मात्र कोर्टाने सरकारला नोटीस जारी न करता निर्देश दिले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser