आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Supreme Court Should Not Hear Bail, Minor Cases; Advice From Law Minister Kiren Rijiju

संसद अधिवेशन:सुप्रीम काेर्टाने जामीन, किरकोळ खटल्यांची सुनावणी करू नये ; कायदामंत्री किरेन रिजिजूंचा सल्ला

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

न्यायमूर्तींच्या नियुक्तीवरून सुरू असलेल्या वादात कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी सर्वोच्च न्यायालयाला सल्ला दिला आहे. राज्यसभेत त्यांनी प्रलंबित हजारो प्रकरणांचा उल्लेख करत सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने जामीन याचिका आणि लहान प्रकरणांवर सुनावणी करायला नको. कायदामंत्र्यांनी सांगितले की, भारताची सर्वात मोठी समस्या ही आहे की, कोणताही निकाल आल्यावर तो प्रथम हायकोर्टात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात जाईल. त्यांनी सांगितले की, कोणत्याही फोरममध्ये कोणत्याही खटल्याचा निकाल आल्यावर न्यायालयात सुनावणी करणे गैर आहे.

नव्या व्यवस्थेपर्यंत रिक्त पदांचा मुद्दा लटकणार रिजिजू म्हणाले, उच्च न्यायालयात रिक्त पदे-नियुक्त्यांचा मुद्दा नवी व्यवस्था येऊपर्यंत लटकत राहील. त्यांनी सांगितले की, नियुक्ती कॉलेजियमच्या शिफारसीवरच होऊ शकते. समाजाच्या सर्व वर्गांचे प्रतिनिधित्व करणारी नावे पाठवण्यास कॉलेजियमला सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...