आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Supreme Court Stays Curlies Club Demolition | Sonali Phogat Murder Case | Marathi News

कर्लीज क्लब पाडण्याला सुप्रीम कोर्टाची स्थगिती:सर्व व्यावसायिक कार्यक्रमांवर बंदी, येथेच सोनाली फोगटला ड्रग्ज दिले होते

नवी दिल्ली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोव्यातील कर्लीज क्लब पाडण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आता क्लबमध्ये कोणतेही व्यावसायिक कार्यक्रम होणार नाहीत, या अटीवर न्यायालयाने स्थगिती दिली आहे. शुक्रवारी सकाळपासून क्लब पाडण्याचे काम सुरू होते. क्लब पाडण्यासाठी बुलडोझरही आला होता. हा तोच क्लब आहे ज्यात भाजप नेत्या सोनाली फोगटला ड्रग्ज देण्यात आले होते.

गोवा प्रशासनानुसार कर्लीज क्लब 'नो डेव्हलपमेंट झोन'मध्ये बांधण्यात आला आहे. 2016 मध्ये गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (GCZMA) ने पाडण्याचे आदेश दिले होते. क्लबचे मालक एडविन नुन्स यांनी या आदेशाला राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (NGT) आव्हान दिले. एनजीटीने 6 सप्टेंबर रोजी GCZMAचा निर्णय कायम ठेवला होता. यानंतर 8 सप्टेंबर (गुरुवार) जिल्हा प्रशासनाने क्लब पाडण्याचे आदेश जारी केले होते.

सोनाली या क्लबमध्ये शेवटची दिसली होती
सोनाली फोगटला 23 ऑगस्टच्या सकाळी गोव्यातील कर्लीज क्लबमध्ये तिचे पीए सुधीर सांगवान आणि तिचा पार्टनर सुखविंदरसोबत शेवटचे पाहिले गेले होते. यानंतर सोनालीचा मृत्यू झाला. क्लबच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुधीर सोनालीला बळजबरीने काही पेय देताना दिसत आहे. चौकशीत सोनालीला ड्रग्ज दिल्याची कबुलीही त्याने दिली होती. यानंतर गोवा पोलिसांनी क्लब सील केला होता.

23 ऑगस्ट रोजी सोनालीची हत्या झाली होती
सोनाली फोगट यांचे 23 ऑगस्ट रोजी गोव्यात निधन झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा पीए सुधीर आणि सुधीरचा मित्र सुधविंदर उपस्थित होते. सोनालीचा भाऊ रिंकू यांच्या तक्रारीवरून गोवा पोलिसांनी सुधीर सांगवान आणि सुखविंदर यांच्यावर खुनाचा आणि एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. क्लब संचालक एडविन नुन्स, दत्ता प्रसाद आणि रमाकांत मसुपा यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

NGTने कर्लेज क्लब 15 दिवसांत पाडण्यास सांगितले होते
एनजीटीच्या आदेशात कर्लीज क्लब पाडण्याची प्रक्रिया 15 दिवसांत पूर्ण करण्यास सांगितले होते. एनजीटीने क्लबचे वीज-पाणी कनेक्शनही तोडण्यास सांगितले होते. यासोबतच उत्पादन शुल्क आयुक्तांनाही क्लबचा बार परवाना रद्द करण्यास सांगितले होते. अंजुमा पंचायतीलाही न्यायाधिकरणाने निर्देश दिले होते.

बातम्या आणखी आहेत...