आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जेईई-एनईईटी रद्द करण्याची मागणी करणार्या सहा राज्यांची याचिका सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी फेटाळली. 17 ऑगस्टच्या कोर्टाच्या निकालाचा आढावा देखील याचिकेत मागवण्यात आला आहे.
Supreme Court refuses to entertain the review petition filed by ministers of six states, seeking review of the court's August 17 order to conduct NEET-UG and JEE (Mains) examinations. pic.twitter.com/3kKLm5VX3n
— ANI (@ANI) September 4, 2020
28 ऑगस्टला दाखल करण्यात आली होती याचिका
कोर्टाने 17 ऑगस्टच्या निर्णयात परीक्षेचे शेड्यूल ठरवण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाविरोधात 28 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. याचिका दाखल करणाऱ्या राज्यांमध्ये पंजाब, झारखंड, पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगड आणि महाराष्ट्राचा समावेश आहे.
महामारी आणि पुरामुळे परीक्षा स्थगित करण्याची मागणी
देशभरात महामारी आणि अनेक राज्यांमध्ये पुरपस्थिरी निर्माण झाली आहे. हे लक्षात घेता विद्यार्थी, पालक, अनेक विद्यार्थी संघटना आणि राजकीय दलांनी परीक्षा स्थिगत करण्याची मागणी केली होती. तर नॅशनल टेस्टिंग एजेंसीने विरोध असूनही कोरोनापासून बचावासाठी आवश्यक गाइडलाइंसह जेईई मेन 1 सप्टेंबरपासून सुरू केली आहे. ही 6 सप्टेंबरपर्यंत चालेल. तिकडे, मेडिकलमध्ये अॅडमिशनसाठी होणारी नीट 13 सप्टेंबरला घेतली जाणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.