आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वंदे भारत मिशन:परदेशातून येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानामध्ये पुढील 10 दिवस मधल्या सीटचे बुकिंग करता येणार - सुप्रीम कोर्ट

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वंदे भारत अभियानांतर्गत परदेशातून 30 हजार भारतीयांची घर वापसी

नवी दिल्ली - परदेशातून भारतीयांना घेऊन येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील मधले सीट रिकामे ठेवण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने आज सुटी असूनही तात्काळ सुनावणी केली. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एस ए बोबडे यांच्या बेंचने एअर इंडियाला पुढील दहा दिवस विमानातील मधील सीट बुक करण्यास परवानगी दिली आहे. मुंबई हायकोर्टाने मागील आठवड्यात एअर इंडियाला विमानातील मधले सीट रिकामे ठेवण्याचे निर्देश दिले होते. केंद्र सरकार आणि एअर इंडियाने हायकोर्टाच्या निर्णयावर सुप्रीमकोर्टात आव्हान दिले होते.

वंदे भारत अभियानांतर्गत परदेशातून 30 हजार भारतीयांची घर वापसी 

कोरोनामुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सरकारने 6 मे रोजी वंदे भारत मिशन सुरु केले होते. या अभियानांतर्गत एअर इंडियाच्या विमानातून लोकांना देशात आणले जात आहे. आतापर्यंत ३० हजार लोंकाना परत आणण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...