आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना रिलीफ फंड प्रकरण:सर्वोच्च न्यायालय म्हणाले-  पीएम केअर्स फंडाचा निधी एनडीआरएफमध्ये ट्रान्सफर केला जाऊ शकत नाही, नवीन रिलीफ फंडचीही गरज नाही

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • याचिका मांडणार्‍या एनजीओने युक्तिवाद केला - सरकारने आपत्ती व्यवस्थापन कायद्याकडे दुर्लक्ष केले
  • सरकार म्हटले होते - कोरोनापासून मुक्ततेसाठी पीएम केअर्स बनवले, कायदा तोडला नाही

कोरोना महामारीविरुद्ध दोन हात करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या पीएम केअर फंडावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले आहे. पीएम केअर फंडातील रक्कम आपत्कालीन प्रतिसाद निधी अर्थात एनडीआरएफमध्ये वळता करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम काेर्टाने फेटाळली. हे दोन्ही निधी वेगवेगळे असल्याचेही सुप्रीम कोर्टाने नमूद केले आहे.

सीपीआयएल नामक संस्थेने एका जनहित याचिकेत ही मागणी केली होती. २७ जुलै रोजी सुप्रीम कोर्टाने यावरील निकाल राखून ठेवला होता. न्या. अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील न्यायपीठाने निकालात म्हटले आहे की, या दोन्ही निधीमध्ये लोक दान स्वरूपात रक्कम देऊ शकतात.

एनडीआरएफमध्ये एखादी व्यक्ती किंवा कंपनीने दान स्वरूपात निधी दिला तर आक्षेप असण्याचे कारण नाही. पीएम केअर फंड पंतप्रधान तत्कालीन परिस्थितीचा विचार करून सुरू करू शकतात. ही रक्कम सरकार योग्य ठिकाणी वळती करू शकते.

पाच प्रश्नांवर महत्त्वाची उत्तरे

सुनावणीदरम्यान मुख्यत्वे पाच प्रश्न उपस्थित झाले. यावर कोर्टाने खालीलप्रमाणे निर्देश दिले.

> कोरोनासाठी सरकारने नवीन राष्ट्रीय आपत्कालीन योजना आखायला हवी?

यासाठी नवीन योजनेची गरज नाही. नोव्हेंबर २०१९ मध्ये काढलेल्या योजनेनुसार मदतीसाठीचे किमान निकष पुरेसे आहेत.

> एनडीआरएफच्या अधिनियमानुसार किमान निकष मदत देण्यास बंधनकारक आहेत?

कोरोनापूर्वीच्या निर्धारित योजना या महामारीशी दोन हात करण्यात पुरेशा आहेत.

> पीएम केअर फंडात योगदान देण्यासाठी कुणावर बंधन आहे?

कोणतीही व्यक्ती किंवा संस्था यांच्यावर असा निधी देण्याचे बंधन नाही.


> पीएम केअर फंडातील रक्कम एनडीआरएफमध्ये वळती करायला हवी?

पीएम केअर फंडातील रक्कम सेवाभावी कार्यासाठी असते. ताे निधी एनडीआरएफमध्ये वळता करण्याची गरज नसते.

सर्वाेच्च न्यायालयाचा हा निकाल सरकारच्या पारदर्शकतेला धक्का

शासनकर्त्यांच्या जनतेबाबत असलेल्या जबाबदारीतील उणीव दाखवणारा हा दिवस आहे. पीएम केअर फंडाला जाब विचारण्याची संधी कोर्टाने गमावली. हा पैसा जनतेचा आहे, मात्र पारदर्शकताच नाही. - रणदीप सुरजेवाला, काँग्रेस प्रवक्ते

बातम्या आणखी आहेत...