आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली:कुख्यात गुंड विकास दुबे एन्काउंटर चाैकशी आयाेगाची सुप्रीम कोर्ट करणार फेररचना

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काेर्टाचा सवाल : 65 खटले असूनही विकास जामिनावर बाहेर कसा?

कुख्यात गुंड विकास दुबे एन्काउंटरच्या चाैकशीसाठी राज्य सरकारने स्थापलेल्या न्यायिक आयाेगाची आता सुप्रीम कोर्ट पुनर्रचना करणार आहे. त्यासाठी सर्वाेच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व निवृत्त पाेलिस अधिकाऱ्यांची नावे देण्यास राज्य सरकारला सांगितले आहे. यावर बुधवारी न्यायालय आदेश देणार आहे.

तत्पूर्वी, सर्वाेच्च न्यायालयाच्या काेणत्याही विद्यमान न्यायाधीशाचा समावेश चाैकशी आयाेगात केला जाणार नाही, असे सरन्यायाधीश एस.ए. बाेबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्पष्ट केले. दरम्यान, दुबेचा फायनान्सर जय बाजपेयीला अटक कानपुरात अटक करण्यात आली.

सुप्रीम काेर्ट लाइव्ह : काेर्टाचा सवाल : 65 खटले असूनही विकास जामिनावर बाहेर कसा?
तुषार मेहता : विकास दुबेवर ६५ गुन्हे दाखल हाेते. ८ पाेलिसांच्या हत्येच्या वेळीही ताे पॅराेलवर हाेता.
सरन्यायाधीश : विकास दुबे काेण हाेता हे सांगू नका. इतक्या गुन्हेगारी घटना घडूनही ताे कसा काय जामिनावर बाहेर हाेता, हे सांगा. त्याच्या गुन्ह्यांचे सर्व रेकाॅर्ड सादर करा. जामीन व पॅराेलसंबंधी आदेशही सादर करावेत.
न्या. बाेपन्ना : हीदेखील तेलंगण चकमकीसारखी दिसते
मेहता : तेलंगण व दुबे चकमक एकसारखी समजू नये.
सरन्यायाधीश : या दाेन्ही वेगळ्या कशा?
हरीश साळवे : हे प्रकरण हैदराबादपेक्षा वेगळे आहे. विकाससारख्या गुन्हेगाराशी सामना झाला तर पाेलिस काय करू शकणार? त्यांचेही मनाेबल खचता कामा नये.
सरन्यायाधीश : कायदा व सुव्यवस्था राखणे ही सरकारची जबाबदारी असते. कायद्याचे नियम भक्कम असतील तर पाेलिसांचे मनाेधैर्य खचणार नाही.

बातम्या आणखी आहेत...