आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण:ईडब्ल्यूएस आरक्षणप्रकरणी आज सुप्रीम कोर्टाचा निकाल

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गासाठी अर्थात ईडब्ल्यूएस घटकांना १० टक्के आरक्षण देण्यासंबंधीच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालय सोमवारी निकाल देणार आहे. सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखालील पाचसदस्यीय न्यायपीठाने सात दिवस याबाबत सुनावणी पूर्ण केली असून आता सरन्यायाधीश लळीत, न्या. दिनेश माहेश्वरी एकत्रितपणे हा निकाल जाहीर करतील, तर न्या. एस. रवींद्र भट्ट, न्या. बेला एम. त्रिवेदी आणि न्या. जे. बी. पारदीवाला वेगळे निकाल देतील.

राज्यघटनेच्या १०३ व्या दुरुस्तीनुसार शिक्षण व सरकारी नोकऱ्यांत ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करण्यात आले आहे. याला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका दाखल झाल्या असून ५ ऑगस्ट २०२० रोजी तत्कालीन सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील न्यायपीठाने हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवले होते. सरन्यायाधीश लळीत यांच्या अध्यक्षतेखालील न्यायपीठाने अशा इतर काही प्रकरणांसह याप्रकरणी सुनावणी केली. त्याला निकाल सोमवारी दिला जाणार आहे. न्या. लळीत ८ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत.

बातम्या आणखी आहेत...