आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Supreme Court Verdict Updates; Sc Dismissed Plea Alleging Bias In Listing Of Cases By Its Registry Officials

खटल्यांची क्रमवारी:सुप्रीम कोर्टात खटल्यांच्या क्रमवारीत पक्षपाताचा आरोप करणारी याचिका फेटाळली, वकिलाला कोर्टाने ठोठावला 100 रुपयांचा दंड

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेजिस्ट्रार प्रभावशाली वकील आणि याचिकाकर्त्यांच्या खटल्यांना प्राधान्य देत असल्याचे केले होते आरोप

सुप्रीम कोर्टात खटल्यांच्या क्रमवारीत पक्षपात होत असल्याचा कथित आरोप करणारी याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. जस्टिस अरुण मिश्रा आणि जस्टिस एसए नजीर यांच्या खंडपीठाने सोमवारी ही याचिका फेटाळताना याचिकाकर्ते वकीलाच्या विरोधात 100 रुपयांचा दंड ठोठावला आहे. खंडपीठाने सांगितल्याप्रमाणे, अशा स्वरुपाच्या याचिकांचे चलनच सुरू आहे. रेजिस्ट्री विभागाचे अधिकारी याचिकाकर्ते आणि वकिलांच्या फायद्यासाठी दिवस-रात्र काम करत असतात असेही न्यायालयाने म्हटले आहे.

खटल्यांच्या क्रमवारीत पक्षपाताचा आरोप तथ्यहीन

याचिकाकर्ते रीपल कंसल यांनी सांगितल्याप्रमाणे, तांत्रिक अडचणींमुळे खंडपीठाने व्हिडिओ काँफ्रन्सिंगच्या माध्यमातून आपला निकाल जारी केला नाही. खंडपीठाने फोनवरून यासंदर्भातील माहिती जारी केली. कोर्टाने सांगितले, की याचिकाकर्त्यांनी केलेल्या आरोपांत काहीच तथ्य नाही. कंसल यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते की सुप्रीम कोर्टाचे नोंदणी अधिकारी खटल्यांच्या क्रमवारीच्या वेळी प्रभावशाली वकीलांना आणि याचिकाकर्त्यांना प्राधान्य देतात. या कठीण काळात व्हर्चुअल सुनावण्या सुरू असताना रेजिस्ट्रारने प्रभावशाली वकील आणि याचिकाकर्त्यांच्या खटल्यांना प्राधान्य देऊ नये अशा स्वरुपाचे निर्देश सुप्रीम कोर्टाने जारी करावे अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती.

पक्षपात करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी यंत्रणाच नाही -याचिकाकर्ता

याचिकाकर्त्याने पुढे लिहिले, लॉ फर्म आणि वकिलांना प्राधान्य देणाऱ्या रेजिस्ट्री अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी कुठलीच यंत्रणा नाही. सामान्य वकील आणि याचिकाकर्त्यांच्या याचिकांमध्ये विनाकारण त्रुटी काढल्या जातात. हे बंद करण्यात यावे. यासोबतच, अतिरिक्त कोर्ट फी आणि इतर शुल्क सुद्धा परत घ्यायला हवे. कोर्टाने 19 जून रोजी या प्रकरणाची सुनावणी घेतली होती. पण, त्यावेळी निकाल सुरक्षित ठेवला होता.

0