आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Supreme Court Warns Of Orphaned Children, Appeals To Upload Children's Information On Website

नवी दिल्ली:काेराेनामुळे अनाथ झालेल्या मुलांची सुप्रीम काेर्टाला चिंता, मुलांची माहिती वेबसाइटवर अपलाेड करण्याचे आवाहन

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काेणीही उपाशी राहायला नकाे, मूलभूत गरजा पूर्ण करा

काेराेना महामारीत आई-वडील गमावणाऱ्या मुलांबाबत सर्वाेच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. न्यायमूर्ती एल. नागेश्वरा राव आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने आई-वडील किंवा त्यांच्यापैकी काेणी एक गमावलेल्या मुलांची जबाबदारी घ्यावी, असे निर्देश सर्व राज्यांच्या जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करा तसेच काेणतेही मूल उपाशी राहणार नाही याची काळजी घ्या. त्यासाठी काेणत्याही शासकीय आदेशाची गरज नाही असेही न्यायालयाने म्हटले आहे. हे काम काेणत्याही आदेशाशिवाय केले जावे. अशा मुलांची माहिती शनिवारी संध्याकाळपर्यंत काेणत्याही परिस्थितीत वेब पाेर्टलवर अपलाेड करावी, असेही न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला सांगितले आहे.

बाल संरक्षण गृह व चाइल्ड केअर साेसायटीमधील मुलांमध्ये कोरोना संसर्ग पसरवण्याच्या प्रकरणाची सर्वाेच्च न्यायालयाने स्वत: दखल घेतली आहे. या प्रकरणात कोर्टाला मदत करण्यासाठी अ‍ॅड. गौरव अग्रवाल यांची ‘न्यायालय मित्र’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अग्रवाल यांनीच एक विनंती अर्ज दाखल करून पालक गमावलेल्या मुलांची काळजी घेण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला हाेता.

मुलांची माहिती अपलाेड करा ‘बाल स्वराज’ पाेर्टलवर
सर्वाेच्च न्यायालाने शुक्रवारी गाैरव अग्रवाल यांना सांगितले की, राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयाेगानेही याची दखल घेतली आहे. त्यांनी ‘बाल स्वराज’ या नावाने एक पाेर्टल सुरू केले आहे. सर्व राज्यांतील अशा मुलांची माहिती अपलाेड करण्यासाठी सांगितले आहे. जेणेकरून त्यांना मदत करण्यासाठी एसआेपीचा अवलंब करता येऊ शकेल. काेराेनामुळे आई-वडील दाेन्ही गमावले आई किंवा वडील गमावलेली मुले, मुलांच्या जबाबदारीचे पालकत्व स्वीकारणारी व्यक्ती गमावलेली असल्यास अशा तीन प्रमुख प्रकारे माहिती अपलाेड करण्यासाठी सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...