आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्राचे उत्तर लीक झाल्यामुळे SC नाराज:केंद्रसरकारला विचारले- सरकारचे प्रतिज्ञापत्र सकाळी 10 वाजता आमच्याकडे आले, परंतु रात्रीच ते माध्यमांना कसे मिळाले?

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

निवडणूक, कुंभ आणि ऑक्सिजन पुरवठा अशा 21 प्रकरणांवर सुप्रीम कोर्टाने सोमवारी सुनावणी केली. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांनी या खटल्यांबाबतचे सरकारी प्रतिज्ञापत्र माध्यमांपर्यंत पोहोचल्याने नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, रविवारी रात्री उशिरा केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात पोहोचवले. आम्हाला ते सोमवारी सकाळी 10 वाजता प्राप्त झाले, परंतु ते रात्रीच माध्यमांपर्यंत पोहोचले होते.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यावर कोर्टाला स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, आम्ही आमचे प्रतिज्ञापत्र इतरही राज्यांना पाठवले होते. तेथून काही गडबड झाली असावी. कोर्टाने सांगिलते की, आम्ही फक्त लसीकरण आणि रुग्णालयात दाखल करण्याच्या धोरणावरील केंद्राचे प्रतिज्ञापत्र वाचू. त्यानंतर कोर्टाने सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब केली.

केंद्राने लसीकरण सर्वात चांगला पर्याय असल्याचे सांगिलते
यापूर्वी रविवारी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. यामध्ये केंद्र सरकारने असे म्हटले की, कोरोना रोखण्यासाठी लसीकरण हा एक उत्तम पर्याय आहे. हा वर्तमानसोबतच दीर्घकालीन कोरोनाशी लढा देण्यासाठी रणनीतीचा एक भाग आहे.

केंद्राने म्हटले होते की, आम्ही लसीकरण वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. लसीची किंमत हा देखील एक मोठा मुद्दा आहे. हे कमी करण्यासाठी केंद्र सरकार देशात तसेच जगभरात प्रयत्न करीत आहे. लसीकरण योजनेत दुर्बल घटकांकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...