आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Supreme Court Issues Guidelines On Alimony To Women : Both Parties Will Have To Provide Sources Of Income Along With Details Of Alimony

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोटगीसाठी दिशानिर्देश:पोटगीसाठी दोन्ही पक्षांना उत्पन्नाच्या तपशिलासह स्रोतही द्यावा लागणार; वैवाहिक प्रकरणात पोटगी देण्यावर सुप्रीम कोर्टाचे निर्देश

नवी दिल्ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उत्पन्न व मालमत्तेचे विवरण येत नाही तोपर्यंत पोटगी न दिल्याबद्दल अटक प्रक्रिया थांबणार

सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वाच्या प्रकरणामध्ये दिलेल्या निकालात महिलेला पोटगी देण्यावरून दिशानिर्देश जारी केले आहेत. यानुसार, आता वाद न्यायालयात गेल्यानंतर दोन्ही पक्षांना आपल्या उत्पन्नाचा सर्व तपशील व त्याचा स्रोतही सादर करावा लागणार आहे. यानंतरच पोटगीची रक्कम ठरवण्यात येईल.

न्यायालयाने निकालात असेही म्हटले की, उच्च न्यायालयानेही याची अंमलबजावणी करावी. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा आणि आर. सुभाष रेड्डी यांच्या पीठाने बुधवारी म्हटले, सर्व प्रकरणांत पोटगीसाठी अर्ज दाखल करण्याच्या तारखेपासून अवॉर्ड दिला जाईल. यात पती-पत्नीदरम्यान वादाची सुनावणी सुरू असताना अंतरिम पोटगीची रक्कम, कालावधी व अन्य बाबींवर स्थिती स्पष्ट करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या दिशानिर्देशांनंतर पोटगीचा दावा करणाऱ्या पक्षास खूप सवलत असेल. या निकालानंतर पोटगीचा दावा तर केला, पण खूप काळापासून पोटगी मिळालीच नाही, अशा पती अथवा पत्नीस दिलासा मिळेल. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या नव्या दिशानिर्देशांची प्रत सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीसोबतच सर्व उच्च न्यायालये आणि उच्च न्यायालयांमार्फत सर्व जिल्हा न्यायालयांना देण्यास सांगितले आहे.

...तोवर अटक प्रक्रिया थांबणार

पती-पत्नी दोघांनाही आता ज्या दिवशी अर्ज केला त्या तारखेपासूनच उत्पन्न व मालमत्तेचा तपशील द्यावा लागेल. जाेवर हे विवरण येत नाही तोपर्यंत पोटगी न दिल्याबद्दल अटक अथवा तुरुंगात पाठवण्याची प्रक्रिया थांबवली जाईल.