आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूरत हायवेवर भीषण अपघातात 6 ठार:डंपरच्या धडकेत कारचा चक्काचूर, मृतांमध्ये 3 महिला, 2 मुलांचा समावेश

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सूरतच्या बारडोली नॅशनल हायवेवर शनिवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 1 पुरूष, 3 महिला आणि 2 मुलांचा समावेश आहे. अपघातग्रस्त कुटुंब एका ईको कारमधून लग्नावरून परतत होते. यादरम्यान सूरत-बारडोली हायवेवर कार आणि डंपरची समोरासमोर धडक झाली.

बारडोलीहून सूरतला परतत होते कुटुंब

बारडोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत कुटुंब सूरतच्या मांडवी जिल्ह्यातील रहिवासी आहे. हे कुटुंब बारडोलीच्या तरसडीतील एका विवाह सोहळ्यासाठी गेले होते. हे कुटुंब बारडोलीहून सूरतला परतत होते. यादरम्यान हा अपघात घडला. बारडोली पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेत शवविच्छेदनासाठी बारडोली रुग्णालयात पाठवले आहे.