आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रीष्मा हत्याकांड:खुनी फेनिल गोयानीला सुरत कोर्टाने सुनावली फाशी

सुरत19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

२१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणी ग्रीष्मा वेकारिया हिचा फेब्रुवारी २०२२ मध्ये खून करणाऱ्या फेनिल गोयानी या आरोपीस सुरतच्या कोर्टाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. हे प्रकरण दुर्मिळात दुर्मीळ असल्याचे सांगत कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. सुरतचे प्रधान सत्र आणि जिल्हा न्यायाधीश व्ही. के. व्यास म्हणाले की, लोकांना महिलांविरुद्धच्या अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी कठोरात कठोर अशी शिक्षा आवश्यकच आहे. ग्रीष्मा वेकारियाचे वडील व गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांनी घटनेनंतर केवळ ७० दिवसांत दिलेल्या कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत केले.

बातम्या आणखी आहेत...