आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरत:अडीच वर्षांच्या ब्रेनडेड मुलाचे कुटुंबाने केले 7 अवयव दान, रशियाच्या मुलावर हृदयराेपण

सुरत7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अडीच वर्षांच्या ब्रेनडेड जश आेझाचे हृदय आता रशियातल्या चार वर्षांच्या मुलामध्ये धकधक करेल. युक्रेनमधील चार वर्षांचा मुलगा त्याच्या फुप्फुसातून श्वासोच्छ्वास घेईल. जश ९ डिसेंबरला शेजारच्या घरात खेळत असताना दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला. त्याच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली होती. सीटी स्कॅन आणि एमआरआयमध्ये मेंदूला सूज असल्याचे दिसले.

१४ डिसेंबरला त्याला ब्रेनडेड घाेषित करण्यात आले. जशचे वडील पत्रकार संजीव ओझा यांनी साश्रुपूर्ण डाेळ्यांनी मुलाचे सात अवयव दान केले. त्यांनी सांगितले की, जशचे एक मूत्रपिंड सुरतच्या १७ वर्षांच्या मुलीला आणि दुसरे सुरेंद्रनगरच्या मुलीला राेपण करण्यात आले. यकृताचे राेपण भावनगरच्या दाेन वर्षांच्या मुलीमध्ये राेपण करण्यात आले. डाेळे लाेकदृष्टी चक्षू बँकेला देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...