आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासूरतच्या पसोदरामध्ये एक मन हेलावून टाकणारी उघडकीस आली आहे. एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने खुलेआमपणे तरुणीवर चाकूने सपासप वार करत तिची हत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. तरुणाच्या या कृत्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. गृह राज्य मंत्री हर्ष सांघवी हे मुलीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी पसोदरा येथे पोहोचले. येथे त्यांनी कुटुंबाचे सांत्वन केले आणि आपल्या मुलीला लवकरच न्याय देणार असल्याचे म्हटले आहे.
तरुणीचे वडील आणि भावावरही केला हल्ला
मुलीला मारण्यापूर्वी या तरुणाने तिच्या वडील आणि भावावर हल्ला केला. यानंतर मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवून तिला घराबाहेर घेऊन गेला आणि नंतर सर्वांसमोर तिच्या गळ्यावर चाकूने वार केले. आजुबाजूच्या लोकांनी मुलीला सोडण्याची विनवणी केली. पण त्याने कुणाचेही ऐकले नाही. सर्वांसमोर तरुणीचा जीव घेतला. यानंतर तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला.
फेनिलला त्याच्या वडिलांनी फटकारले होते
फेनिलचे वडील पंकज गोयानी यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'आमचेच नाणे खोटे निघाले. तो कॉलेजमध्ये एक वर्ष ग्रिष्माला त्रास देत होता. त्यावेळी मुलीच्या कुटुंबियांनीही तक्रार केली होती. त्यावेळीच आम्ही फेनिलला फटकारले होते. यावेळी तो मला म्हणाला होता की, तो आता तिला त्रास देणार नाही. पण तो सुधरला नाही. त्याने जे केले ते लाजिरवाने आहे. जर कायद्याने त्याला मृत्यूदंड दिला तरी आम्हाला काही हरकत नाही.
आम्ही अशी शिक्षा देऊ की, पुन्हा अशी घटना घडणार नाही : हर्ष सांधवी
रविवारी संध्याकाळी राज्याचे गृहमंत्री हर्ष सांघवी हे ग्रिश्माच्या घरी गेले होते. मंत्री म्हणाले की, आता कुटुंबाला न्याय मिळेल. घटनेच्या तपासासाठी वेगवेगळ्या टीम तयार केल्या आहेत. एफएसएल रिपोर्ट 24 तासांच्या आत उपलब्ध होतो. फुटेज आणि मोबाइल रेकॉर्डिंग सापडले आहेत. आरोपीला अशी शिक्षा दिली जाईल की, पुन्हा कोणीही असे कृत्य करणार नाही. ग्रिष्माच्या कुटुंबाचा खटला वकील सरकारच्या पैशाने लढतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.