आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरतमध्ये योगा करताना आला हार्ट अटॅक:44 वर्षीय व्यक्तीच्या छातीत उठली कळ, रुग्णालयात पोहोण्यापूर्वीच झाला मृत्यू

सुरत22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
​​​​​​​एरोबिक्स शिकवणाऱ्या पत्नीसह योगा करण्यासाठी गेला होता. (इन्सेटमध्ये मृत मुकेश भाई यांचे संग्रहित छायाचित्र) - Divya Marathi
​​​​​​​एरोबिक्स शिकवणाऱ्या पत्नीसह योगा करण्यासाठी गेला होता. (इन्सेटमध्ये मृत मुकेश भाई यांचे संग्रहित छायाचित्र)

कोरोनानंतर तरुणांना हार्ट अटॅक येण्याच्या घटनांत चांगली वाढ झाली आहे. गत काही महिन्यांत अशा अनेक घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना गुरुवारी घडली आहे. त्यात योगा व एरोबिक्स करताना एका 44 वर्षीय व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला आहे.

पत्नी एरोबिक्स शिकवत होती

यासंबंधीच्या वृत्तानुसार, शहरातील किरण चौकाजवळ मुकेश भाई यांची पत्नी पायल गजानन एरोबिक्स अँड योगा क्लबमध्ये मेंदपरा एरोबिक्स शिकवतात. हीरा कारखान्यात काम करणारे मुकेश मेंदपरा सुट्टी असल्यामुळे पत्नीसोबत योगा शिकण्यासाठी गेले होते. तिथे योगा करताना त्यांना अ‍ॅसिडिटीचा त्रास झाला. अस्वस्थ वाटू लागल्याने व छातीत तीव्र कळा येत असल्याने त्यांना ऑटोने रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मुकेश भाई यांना योगा करताना अ‍ॅसिडीटी व छातीत वेदना झाल्याचा त्रास झाला.
मुकेश भाई यांना योगा करताना अ‍ॅसिडीटी व छातीत वेदना झाल्याचा त्रास झाला.

योगा करताना पोटात जळजळ होत असल्याचा त्रास

हा योगा क्लब चालवणारे भरतभाई खुंटे यांनी सांगितले की, मुकेश यांची पत्नी या क्लबमध्ये एरोबिक्स शिकवते. सुट्टीच्या दिवशी मुकेश आपल्या पत्नीसह योगा शिकण्यासाठी आले होते. सकाळी येथे आल्यानंतर त्यांच्या पोटात जळजळ व अ‍ॅसिडीटीसारखी समस्या होत होती.

रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

यांना खेळताना आला होता अटॅक

  • 29 जानेवारी: वराछाच्या 26 वर्षीय प्रशांत कांतीभाई भारोलिया यांचा क्रिकेट खेळताना अकस्मात निधन झाले.
  • 30 जानेवारी : राजकोटमधील विवेक कुमार (21) नामक महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा फुटबॉल खेळताना मृत्यू झाला.
  • 5 फेब्रुवारी : जहांगीरपुरा येथील रहिवासी व ओलपाड कोर्टात कार्यरत वकील अतुल पटेल यांच्या 27 वर्षीय मुलाचा क्रिकेट खेळताना अटॅकने मृत्यू झाला.
  • 15 फेब्रुवारी : राजकोट येथील 40 वर्षीय भरत बरैया क्रिकेट खेळून घरी येत होते. रस्त्यात त्यांच्या छातीत तीव्र वेदना होऊन त्यांचा मृत्यू झाला.
  • 19 फेब्रुवारी : राजकोट येथीलच 31 वर्षीय जिग्नेश चौहान यांचा क्रिकेट खेळताना मृत्यू झाला.
  • 5 मार्च : ओलपाड येथे क्रिकेट खेळत असताना निमेश अहिर अचानक बेशुद्ध पडला. उपचारानंतरही त्याला वाचवता आले नाही.

अचानक झालेल्या मृत्यूशी संबंधित खालील बातम्या वाचा...

मेहुणीच्या लग्नात नाचताना मेहुण्याचा मृत्यू, VIDEO:सरकारी शाळेत फिजिकल ट्रेनर होते, हार्ट अटॅकने अवघ्या 5 सेकंदांत मृत्यू

राजस्थानच्या पालीमध्ये मेहुणीच्या लग्नात आनंदाने नाचणाऱ्या मेहुण्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे लग्नाचा आनंद साजरा करणाऱ्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली. शहरातील महात्मा गांधी कॉलनीत शुक्रवारी रात्री ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ शनिवारी व्हायरल झाला. येथे वाचा संपूर्ण बातमी...

क्रिकेट खेळता-खेळता हार्ट अटॅकने मृत्यू:अहमदाबादमध्ये जीएसटी अधिकारी गोलंदाजी करताना जमिनीवर कोसळले

गुजरातमध्ये क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. क्रिकेट सामन्यादरम्यान एका GST अधिकाऱ्याचा अचानक ह्रदयविकाराचा धक्का आला आणि तो जागेवरच कोसळला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...

बातम्या आणखी आहेत...