आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Surat Outside Workers Caused Commotion, Sabotage, Stone Pelting, Damage To Vehicles

तोडफोड:सुरतमध्ये मजुरांचा उद्रेक, जमावास पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीमार, ५० हून अधिक लोकांची मुंडण करून निदर्शने

सुरत 2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
घरी परत पाठवून देण्याची मागणी लावून धरत सुरतमध्ये मोठ्या संख्येने परप्रांतीय मजुरांचा जमाव रस्त्यावर उतरला होता. - Divya Marathi
घरी परत पाठवून देण्याची मागणी लावून धरत सुरतमध्ये मोठ्या संख्येने परप्रांतीय मजुरांचा जमाव रस्त्यावर उतरला होता.
  • प्रवासाचे भाडे घेण्यात आले पण बसमध्ये बसू दिले नाही - लोकांचा आरोप

लॉकडाऊन सुरू असताना गुजरातमधील सुरत शहरात बाहेरून आलेले मजूर घरांकडे परत पाठवण्याची मागणी करत, हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले. त्यांनी पोलिसांवर दगडफेकही केली. तसेच रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार सुरू केला. सुरक्षा दलाने जमावावर अश्रुधूर सोडला. ही घटना सोमवारी वरेली गावाबाहेर घडली. 

दरम्यान, पंदेसरा येथे ५० लोकांनी मुंडण करून निदर्शने केली.  काही लोकांचा आरोप होता की, आमच्याकडून प्रवासाचे भाडे घेण्यात आले. पण बसमध्ये बसू दिले नाही. दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश व झारखंडमधील बसेसमधून अनेक परप्रांतीय कामगार त्यांच्या घरी परत जात होते. परंतु स्थानिक प्रशासनाने आम्हाला राेखले. त्यामुळे आम्हाला गावी जाता आले नाही. आम्ही कठीण परिस्थितीत प्रवासाचे पैसे गोळा केले होते. आमच्याकडून पैसे घेतले, पण आता आम्हाला पाठवले गेले नाही. उलट आमचे पैसेही परत केले जात नाहीत, असा त्यांचा आरोप होता. 

कोझिकोडमध्ये रास्ता रोको

वाहनांची सोय करण्याची मागणीवरून राष्ट्रीय महामार्गावर २०० मजुरांनी रास्ता रोको आंदोलन केले. कामगार कोझिकोड-मंगळुरू मार्गावर ठिय्या आंदोलन करत होते. त्यांनी वाहने रोखून धरली होती. यानंतर पोलिसांनी लाठीमार करून जमावास पांगवले. हे कामगार बिहार, झारखंड व ओडिशातील होते. सोमवारी विशेष रेल्वे रद्द झाल्याने त्यांच्यात नाराजी दिसून आली.

बातम्या आणखी आहेत...